शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

“विकासासाठी नाही तर शरद पवारांना संपवण्यासाठी भाजपा महाराष्ट्रात”; सुप्रिया सुळेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2024 11:49 IST

Supriya Sule Vs BJP News: तुमच्या घरातील पुतण्या बिभिषण म्हणून आमच्याकडे येतो आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता, असा पलटवार भाजपाकडून करण्यात आला आहे.

Supriya Sule Vs BJP News: लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकारण तापताना दिसत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याचे सांगितले जात आहे. जाहीर केलेल्या उमेदवारीवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधक सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपावर टीका करताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर घणाघाती टीका केली असून, भाजपाकडून याला प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

मीडियाशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवारांना राजकारणातून संपुष्टात आणण्यासाठी भाजपा आता उतरली आहे. भाजपाला महाराष्ट्रात विकास करायचा नाही. भाजपाला भ्रष्टाचाराच्या विरोधात जायचे नाही. त्यांना बेरोजगारीबाबत लढा द्यायचा नाही. त्यांना महागाई कमी करायची नाही. भाजपा सुडाचे राजकारण करत आहे. जो कोणी नेता महाराष्ट्राची आन-बान-शान दिल्लीत गाजवतो, त्याला राजकारणातून संपवायचे, अशी कबुली भाजपानेच दिली आहे, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी हल्लाबोल केला. यावर, भाजपा नेते आणि चंद्रपूर लोकसभेसाठीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी पलटवार केला आहे. 

तुमच्या घरातील पुतण्या बिभिषण म्हणून आमच्याकडे येतो

तुमच्या घरातील पुतण्या तुमच्या विरोधात जातो आणि तुम्ही आमच्यावर आरोप करता. तुमच्या घरातील पुतण्या बिभिषण म्हणून आमच्याकडे येतो आणि तुम्ही आम्हाला सांगायचे. तुमची आजपर्यंतची काय सवय आहे की, शेकापचे उमेदवार सख्खे भाऊ होते, तेव्हा शरद पवारांनी काय केले. त्यांचा विश्वासघात केला. तुमची तुमच्या कृतीने आणि चुकीने स्वतःच संपत आहात, या शब्दांत मुनगंटीवार यांनी पलटवार केला.

 

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाSudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार