राजकीय नेत्यांवर गंभीर आरोपांची राळ उठवणाऱ्या बडतर्फ PSI कासलेचा अजून एक कारनामा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2025 08:25 IST2025-04-21T08:25:00+5:302025-04-21T08:25:13+5:30

अखेर चौधरी यांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात कासलेच्या विरोधात तक्रार दिली.

Sudhir Chaudhary, a businessman from Ambajogai, has alleged that Ranjit Kasle took advantage of his friendship and defrauded him of as much as six lakh rupees | राजकीय नेत्यांवर गंभीर आरोपांची राळ उठवणाऱ्या बडतर्फ PSI कासलेचा अजून एक कारनामा उघड

राजकीय नेत्यांवर गंभीर आरोपांची राळ उठवणाऱ्या बडतर्फ PSI कासलेचा अजून एक कारनामा उघड

अंबाजोगाई (जि. बीड) : विविध पोलिस अधिकारी आणि राजकीय नेते यांच्यावर गंभीर आरोपांची राळ उठवून वादग्रस्त ठरलेल्या बडतर्फ पीएसआय रणजीत कासलेचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. कासले याने मैत्रीचा गैरफायदा घेत तब्बल सहा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप अंबाजोगाई येथील व्यावसायिक सुधीर छगनराव चौधरी यांनी केला आहे. याप्रकरणी अंबाजोगाई शहर ठाण्यात कासले याच्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

सुधीर चौधरी हे अंबाजोगाई येथे कुणाल इंटरप्रायजेस नावाने एनर्जी ड्रिंकची एजन्सी चालवतात. चौधरी यांच्या तक्रारीनुसार, एप्रिल २०२४मध्ये कासले याने आईची प्रकृती खालावल्याचा बनाव रचून चौधरी यांच्याकडून प्रथम विविध फोन पे नंबरवरून एक लाख रुपये घेतले. यानंतर १५ एप्रिल रोजी दवाखान्याच्या खर्चासाठी रोख रक्कम लागल्याचे सांगून रेस्ट हाऊस, अंबाजोगाई येथे भेट घेऊन पाच लाख रुपये कॅश स्वरुपात घेतले. हे पैसे चौधरी यांनी आपल्या वडिलांच्या खात्यातून काढून दिले होते. त्यानंतर अनेकदा मागणी करूनही कासले याने पैसे परत केले नाहीत. माझी गाडी खासगी सावकाराकडे ठेवून मला व्याजावर पैसे मिळवून दे आणि आपला व्यवहार संपवू, असा सल्ला देत त्याने फसवणुकीची परिसीमा गाठली. त्यानंतरही त्याने प्लॉट विकून पैसे देतो, असा पुन्हा वेळकाढूपणा केला. अखेर चौधरी यांनी अंबाजोगाई शहर ठाण्यात कासलेच्या विरोधात तक्रार दिली. बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक रणजीत कासले हे स्वतःच्या खात्यावर दहा लाख रुपये धनंजय मुंडे यांच्या माणसांनी पाठवले, असे सांगत होते. 

Web Title: Sudhir Chaudhary, a businessman from Ambajogai, has alleged that Ranjit Kasle took advantage of his friendship and defrauded him of as much as six lakh rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.