शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यात अचानक भारनियमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 06:05 IST

राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे बुधवारी आकस्मिक भारनियमन करावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील वीज सकाळपासून गुल झाली होती.

रत्नागिरी/भुसावळ : राज्यात कोळशाचा तुटवडा जाणवत असल्यामुळे बुधवारी आकस्मिक भारनियमन करावे लागले. त्यामुळे अनेक भागांतील वीज सकाळपासून गुल झाली होती. काही ठिकाणी चार ते सव्वासहा तासांपर्यंत भारनियमन करण्याची नामुश्की महावितरणवर ओढविली. राज्यात १७ हजार ४७० मेगावॅट विजेची मागणी असून, १५ हजार ७३ मेगावॅट पुरवठा महावितरणकडून करण्यात होत आहे. २ हजार ३९७ मेगावॅटचा तुटवडा झाल्याने आकस्मिक भारनियमन करावे लागले. बी, सी, डी, ई, एफ, जी (१), जी (२), जी (३) गटातील फिडरवर सकाळपासून भारनियमन करण्यात आले, अशी माहिती सूत्रांनी दिली. भुसावळजवळील दीपनगर वीजनिर्मिती केंद्राला रोज सहा रॅक कोळशाची गरज असताना केवळ चार रॅक कोळसा मिळत असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता आर. आर. बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली. 

राज्यातून एकूण १७ हजार ४७० मेगावॅट विजेची मागणी होत असताना १५ हजार ७३ मेगावॅट विजेचा पुरवठा महावितरणकडून करण्यात येत आहे. २ हजार ३९७ मेगावॅट विजेचा तुटवडा जाणवत असल्यामुळे राज्यात आकस्मिक भारनियमन जाहीर करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील १४५ फिडरना भारनियमनाचा फटका बसला. रत्नागिरी जिल्'ातील फिडर्सचा समावेश ए ते डी ग्रुप मध्ये होतो. आकस्मिक भारनियमन झाल्यामुळे ग्राहकांची विजेअभावी गैरसोय झाली.महावितरणला उपलब्ध झालेली वीजमहानिर्मिती कंपनी-४,७०० मेगावॅटअदानी प्रकल्प- १७०० मेगावॅटरतन इंडिया कंपनी -५००केंद्रीय प्रकल्प -३,४००जिंदाल प्रकल्प -३००सीजीपीएल -५८०एम्को- १००पवन ऊर्जा -१०० ते २००उरण गॅस प्रकल्प -३८०कोयनासह जलविद्युत प्रकल्प -१००० ते १२००अल्पकालीन कराराद्वारे खरेदी- ७००गरज सहा रॅकची मिळतो चार रॅक कोळसाभुसावळ (जि. जळगाव) : दीपनगर येथील वीजनिर्मिती केंद्राला सध्या कमी कोळसा मिळत आहे. या वीजनिर्मिती केंद्राला सध्या रोज सहा रॅक कोळशाची गरज असता चार रॅक कोळसा मिळत असल्याची माहिती मुख्य अभियंता आर.आर. बावस्कर यांनी ‘लोकमत’ला दिली.दरम्यान, दीपनगर वीज केंद्रात सध्या ५०० मेगावॅट क्षमतेचे दोन संच कार्यान्वित आहेत. त्यातून ६०० मेगावॅट वीज निर्मिती सुरू आहे. अशा परिस्थितीतही दीपनगर वीज केंद्राकडे ३७ हजार टन कोळशाचा साठा आहे.५०० मेगावॅटच्या दोन संचांसाठी रोज रेल्वेचे सहा रॅक भरून कोळसा लागतो. मात्र सध्या देशात व राज्यात कोळशाची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे मागणीपेक्षा कमी कोळसा मिळत आहे, ही स्थिती फार दिवस राहणार नाही. यात लवकरच बदल होऊन पुरेसा कोळसा मिळेल, असा दावा त्यांनी केला. एका रॅकमध्ये ३६ मे.टन कोळसा येतो. एका रॅकला ५९ डबे असतात. आपल्याला चार रेक मिळतो, असे त्यांनी सांगितले.मराठवाडा : औरंगाबाद, जालन्यात नऊ तासांपर्यंत भारनियमनऔरंगाबाद : विजेच्या तुटवड्याने महावितरणने बुधवारी तब्बल नऊ तासांपर्यंत लोडशेडिंग केल्याने परिमंडळातील औरंगाबाद आणि जालन्यातील नागरिकांना झटका बसला. परिमंडळातील ९५ टक्के म्हणजे २७७ फिडरची वीज गुल होती. यामध्ये औरंगाबादेतील ७३ फिडरवरील वसाहतींमध्ये सकाळपासूनच वीजपुरवठा खंडित झाला.सप्टेंबरमध्ये सुरू झालेले भारनियमन नवरात्रीत कमी झाले होते. नागरिकांना थोडा दिलासा मिळत नाही तोच पुन्हा सुरू झाले. शहरातील विविध भागांत बुधवारी सकाळीच वीजपुरवठा बंद झाला. आॅक्टोबर हिटचा चांगलाच कडाका जाणवत आहे. त्यात भारनियमनामुळे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर येत आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिकांनी तीव्र रोष व्यक्त केला.औरंगाबाद परिमंडळातील औरंगाबाद आणि जालन्यात २८७ फिडर आहेत. एकूूण ७ लाख ६० हजार वीज ग्राहक आहेत. औरंगाबाद शहरात ८३ फिडर असून, २ लाख ८२ हजार ग्राहक आहेत. औरंगाबाद आणि जालन्यातील २८७ फिडरपैकी केवळ १०, तर औरंगाबादेतील ८३ पैकी १० फिडरवर लोडशेडिंग झाले नाही. उर्वरित सर्व फिडरवर ९ तास १५ मिनिटांपर्यंत भारनियमन करण्यात आले.

अवघ्या २५ हजार ग्राहकांना दिलासाएका फिडरवर जवळपास अडीच हजार वीजग्राहक आहेत. शहरातील १० फिडरवरील वीजपुरवठा सुरळीत राहिल्याने जवळपास २५ हजार ग्राहकांना दिलासा मिळाला; परंतु २ लाख ५७ हजार वीज ग्राहकांना भारनियमनाचा फटका बसला.

दिवाळीत पुरवठा सुरळीतपाऊस चांगला पडल्याने शेतीचे पंप सुरू झाले आहेत. त्यामुळे विजेची तूट आहे. दिवाळीमध्ये उद्योग बंद असतात. त्यामुळे दिवाळीच्या तीन दिवसांत भारनियमन होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. ज्याप्रमाणे मोबाइलचे बिल वेळेवर भरले जाते, त्याचप्रमाणे विजेचे बिलही वेळेवर भरले पाहिजे, असे महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर म्हणाले.

विजेचा तुटवडा वाढला१६ आणि १७ सप्टेंबर आणि २९ आणि ३० सप्टेंबर असे ४ दिवस वगळता शहरात सुरू असलेल्या भारनियमनादरम्यान १०० मेगावॅट विजेचा तुटवडा होता. तो आता २५ ते ३० मेगावॅटने वाढला आहे. त्यामुळे महावितरणने बुधवारी सकाळी ११ वाजेनंतर सी आणि बी गटातील फिडरवरही भारनियमन केले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र