शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकराचे सूचक विधान
2
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
3
हैदराबादमध्ये शंभर वर्षे जुने मंदिर पाडण्यावरुन मोठा वाद; माधवी लतांना पोलिसांनी घेतले ताब्यात
4
जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांना काढून टाकले; कुणी केली टीका?
5
७२ लाखांत घ्या लॅम्बोर्गिनीची मजा! देशातील पहिली इलेक्ट्रीक सुपर कार लाँच, १०० च्या स्पीडला...  
6
लष्कराच्या ताफ्यात नवं हत्यार! अचूक निशाणा अन् करेक्ट कार्यक्रम; ड्रोनने डागली मिसाईल, DRDO ला मोठं यश
7
Mumbai Rain Alert: 'काम नसेल तर घरीच थांबा!' मुंबईत पावसाचा धुमाकूळ, लोकल रेल्वे सेवेला फटका
8
"मला इलॉन मस्कची गरज," आरोप-प्रत्यारोपांनंतर आता अचानक का बॅकफूटवर आले डोनाल्ड ट्रम्प?
9
Video : माणुसकीला काळीमा! कॅन्सरग्रस्त आजीला नातेवाईकांनी रस्त्यावर सोडले; व्हिडीओ व्हायरल
10
१० लाख नवीन नोकऱ्या, १० कोटी घरांना ब्रॉडबँड...दूरसंचार धोरणा 2025 चा मसुदा जारी
11
“CM फडणवीसांना साफ-सफाईची मोहीम घ्यावी लागेल, ४ मंत्री जाणार”; संजय राऊतांनी नावेच सांगितली
12
मुंबईच्या चाळीत जन्म, १५ व्या वर्षी शाळा सुटली; आज कोट्यवधींच्या कंपनीचे मालक! कोण आहे ही व्यक्ती?
13
मेड इन इंडिया कारची ग्लोबल एनकॅपमध्ये क्रॅश टेस्ट झाली; हलक्यात न घेण्यासारखे स्टार घेऊन आली...
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींना लंडनमध्ये चहा पाजणारा 'हा' युवक कोण?; भारताशी आहे खास कनेक्शन
15
Crime: गर्भवती पत्नीची हत्या करून मृतदेहाजवळच...; घटना ऐकून पायाखालची जमीन सरकेल!
16
श्रावणात सापांचा कहर, एकाच घरातून निघाले 60 विषारी नाग; गावात भीतीचे वातावरण
17
Crime News : इन्स्टाग्रामवरील कमेंटमुळे जीवाला मुकला! आधी छोले-भटुरे खायला दिले, नंतर २७ वेळा चाकूने वार केले
18
श्रावण शनिवार: प्रल्हादासाठी घेतलेल्या अवताराचे स्मरण, ‘असे’ करा नृसिंह पूजन; पाहा, मान्यता
19
महाराष्ट्रातील नोकऱ्यांसाठी यूपी-बिहारच्या विद्यार्थ्यांची जोरात तयारी, शिकतायेत मराठी
20
Bajaj Finance Share: नफा वाढला, तरी बजाज फायनान्सचा शेअर आपटला; ब्रोकरेजनं का बदललं रेटिंग?

सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण? सगळे लपवण्याचा प्रयत्न?; अंजली दमानियांचा पुन्हा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 13:43 IST

अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आरोपींच्या जबाबातून स्पष्ट होत नसल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

Anjali Damania: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान दिवसागणिक नवे तपशील समोर येत आहेत. पवनचक्की कंपनीच्या बाहेर करण्यात आलेल्या मारहाणीमुळे आम्ही सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुले या आरोपीने दिल्यानंतर आता समाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी वेगळीच शंका उपस्थित केली आहे. "सुदर्शन घुले याचा जबाब अपूर्ण? सगळे लपवण्याचा प्रयत्न? एका स्टँडर्ड फॉर्मेटसारखा तीनही आरोपींचा जबाब आहे," असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

आरोपींच्या जबाबावरून तपास यंत्रणांवर प्रश्नांची सरबत्ती करताना अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे की, "खुनानंतर आरोपींनी पळून जायचं कसं ठरवलं? कोणी मदत केली, कुठे गेले, कृष्णा आंधळे कधीपर्यंत त्यांच्याबरोबर होता, कुणाच्या सांगण्यावरून ते पळाले, या काळात कराडशी बोलणं झाला की नाही, मुंडेंनी मदत केली का? ते कुठे-कुठे पळाले, भिवंडीला किती दिवस होते, कोणी पैसे पोहोचवले, मग ते पुण्यात कसे आले, कोणी यायला सांगितलं? कृष्णासोबत त्यांनी काय केलं? सिद्धार्थ सोनवणे वेगळा कसा व कधी झाला ? डॉ. वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले? हे काहीच आरोपींच्या जबाबात आलेलं नाही," असं दमानिया यांनी आपल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांचा उलगडा तपास यंत्रणांकडून आगामी काळात केला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

जयराम चाटेने जबाबात काय म्हटलंय?

मस्साजोग शिवारातील अवादा एनर्जी कंपनीच्या गोदामाच्या परिसरात ६ डिसेंबर रोजी सुदर्शन घुले, प्रतीक घुले व इतरांना सरपंच संतोष देशमुख व त्यांच्या गावच्या काही नागरिकांनी केलेली मारहाण ही सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच करण्यात आली, असा जयराम चाटे याने पोलिसांना जबाब दिल्याची माहिती समाज माध्यमांवर शुक्रवारी प्रसारित होताच तालुक्यात एकच खळबळ उडाली. जयराम चाटे याने आपल्या जबाबात ९ डिसेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास सुदर्शन घुले, मावसभाऊ कृष्णा आंधळे, प्रतीक घुले सोबत असताना सुदर्शन घुले व इतरांना अवादा कंपनीच्या गोदामाच्या परिसरात झालेल्या मारहाणीमुळे वाल्मीक कराडची बीड जिल्ह्यात इमेज डाऊन झाली आहे. त्यामुळे सरपंच संतोष देशमुख याला ताब्यात घेऊन त्याला चांगलीच अद्दल घडवायची आहे, अशी बैठक वाल्मीक कराडच्या परळी येथील जगमित्र कार्यालयात झाल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :anjali damaniaअंजली दमानियाbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडCrime Newsगुन्हेगारी