शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

महाडमध्ये जप्त केलेले सक्शन पंप धूळखात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:36 IST

लिलाव प्रक्रिया रखडली : चार वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात भंगार पडून

दासगाव : गेली अनेक वर्षे वाळूमाफियांकडून वाळूचे अनधिकृत उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारे सक्शन पंप वारंवार खाडीमध्ये जाऊन महसूल विभागाने जप्त केले. जप्त केल्यानंतर हे पंप गेल्या चार वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आवारात भंगार म्हणून पडून आहेत. महसूल विभाग यावर कोणतीच लिलावाची कारवाई करत नसल्याने सध्या हे सक्शन पंप सार्वजनिक बांधकाम विभागाची डोकेदुखी बनली आहे. काही पंप न्यायालयीन प्रक्रियेत असल्याचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले.सावित्री खाडीमध्ये काही प्रमाणात वाळू उत्खननाला हातपाटीद्वारे वारंवार परवानगी देण्यात आली. कमी बोटी आणि कमी परवाना त्याचप्रमाणे हातपाटीद्वारे होणारे कमी उत्पादन यासाठी वाळूमाफियाने अनेक वर्षे या खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उत्खननासाठी सक्शन पंपाचा वापर केला. अनधिकृत होणारे वाळू उत्खनन यावर लगाम लावण्यासाठी अनेक वेळा महाड महसूल विभागाने कारवाई करत अनेक पंप जप्त केले. महाड प्रांत कार्यालयात आणून ते एका पटांगणात ठेवले होते. दरवर्षी जप्त करण्यात येणाऱ्या सक्शन पंपात वाढ होत असल्याने प्रांत कार्यालयामागील जागा ही सक्शन पंपाला अपुरी पडू लागली. त्यामुळे येथून पंप नवीन झालेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या समोरील मोकळ्या जागेत नेण्यात आले. चार ते पाच वर्षांच्या काळात जवळपास ३५ सक्शन पंप जप्त करण्यात आले. या पटांगणात ठेवण्यात आलेल्या या पंपांना जवळपास पाच वर्षे झाली असून, महसूल खात्याने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. या सक्शन पंपाचा कोणत्याही तºहेचा उपयोग करता येणार नसून हे भंगारात काढणे गरजेचे आहे. मात्र, आजही महसूल खात्याने त्याची कोणतीच निविदा काढलेली दिसून येत नाही.खाडीमध्ये सक्शन पंपाच्या वापरामुळे शासनाचा महसूल बुडाला आहे. मात्र, जप्त करण्यात आलेल्या पंपांचा लिलाव झाला तर बºयाच प्रमाणात शासनाला भरपाई मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठेवण्यात आलेल्या सक्शन पंपामुळे एकतर सार्वजनिक बांधकाम खात्याची जागा अडून राहिली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी डासांचा प्रादुर्भावही झाला आहे. यामुळे अनेक समस्यांना सार्वजनिक बांधकाम खात्याला सामोरे जावे लागत आहे. या होड्या हटवण्यासाठी महसूल विभागाला सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्रान्वये कळवले आहे. मात्र, अद्याप याबाबत कार्यवाही झालेली नाही.२०१९ मधील अतिवृष्टीमध्ये महाड शहरात आलेल्या पुरात यातील एक मोठी होडी पुराच्या पाण्याच्या प्रवाहात वाहत निघाली. मात्र, ती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या रस्त्यावर येऊन थांबली. यामुळे कार्यालयाकडे येणारा मार्ग बंद झाला होता. आता तरी या होड्या हटवणे गरजेचे आहे. किंवा या होड्यांची लिलाव प्रक्रिया होणेगरजेचे आहे.ज्या होड्या किंवा सक्शन पंपांच्या तक्रारी न्यायालयात आहेत, त्या वगळता अन्य होड्यांची लिलाव प्रक्रिया करता येणे शक्य आहे का? याबाबत न्यायालयीन सहमती घेऊन प्रक्रिया केली जाईल.- विठ्ठल इनामदार, प्रांताधिकारी, महाड