शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

"शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत"; समाजकंटकांच्या नारेबाजीवरून CM शिंदेचा इशार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 17:55 IST

या संपूर्ण घटनेनंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. "शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत," असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या राज्यस्तरीय नेत्यांना एनआयए आणि ईडी या केंद्रीय तपास यंत्रणांनी अटक केली आहे. याच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या ६० ते ७० जणांवर पुणे पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी काही समाजकंटकांनी मोठमोठ्याने घोषणा देत रस्ता अडवला. यात पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर, अशा घोषणा देण्यात आल्या. याचा व्हिडिओदेखील जबरदस्त व्हायरल होत आहे. या संपूर्ण घटनेनंतर, आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे. "शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत," असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत -यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट केले आहे, की "पुण्यात ज्या समाजकंटकांनी पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले त्या प्रवृत्तीचा करावा तेवढा निषेध कमीच आहे. पोलीस यंत्रणा त्यांच्याविरोधात योग्य ती कारवाई करेलच, पण शिवरायांच्या भूमीत असले नारे अजिबात सहन केले जाणार नाहीत."

याप्रकरणी संबंधित समाजकंटकांविरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रिजाज जैनुद्दीन सय्यद (वय 26, शिवनेरी नगर कोंढवा खुर्द) याच्यासह 60 ते 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादवी 141 143 145 147 149 188 341 सह मपोका 37/1/3 सह 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार नवनाथ डांगे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

महाराष्ट्रात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही -पुण्यातील या घटनेनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. "महाराष्ट्रात, भारतात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करू, घोषणा देणारे जिकडे असतील, तिकडून त्यांना शोधून काढू, असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. एढेच नाही, तर पीएफआयकडून देशात अशांतता निर्माण करण्याचे षडयंत्र रचण्यात येत होते, अशी माहितीही त्यांनी दिली. ते माध्यमांशी बोलत होते. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPuneपुणेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस