...अशी चूक पुन्हा घडू नये - मांडवगणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:00 AM2019-05-23T06:00:50+5:302019-05-23T06:01:04+5:30

भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली.

... such a mistake should not happen again - murmur | ...अशी चूक पुन्हा घडू नये - मांडवगणे

...अशी चूक पुन्हा घडू नये - मांडवगणे

Next

- अझहर शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : काश्मीरमधील बडगाम येथे २७ फे ब्रुवारी रोजी सकाळी भारतीय वायुदलाच्या लढाऊ एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टरला अपघात होऊन नाशिकच्या डीजीपीनगरमधील सहवैमानिक स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्यासह सहा जवानांना वीरमरण आले. देशाच्या संरक्षणासाठी निनादने आपले बलिदान दिले आहे. त्याच्या वीरमरणाचा सरकारने उचित सन्मान करावा आणि भारतीय सैन्याने यंत्रणेतील दोष निवारण क रून यापुढे अशी चूक घडणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशी भावना निनाद यांचे वडील अनिल मांडवगणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.


भारतीय वायुसेनेने २६ फेबु्रवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरच्या भागात घुसून कारवाई (एअर सर्जिकल स्ट्राइक) केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी जम्मूच्या राजौरी सेक्टरच्या दिशेने घुसखोरीचा प्रयत्न केला. त्याचदिवशी निनाद व त्यांच्या सहकारी जवानांचे लढाऊ हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळले. सुरुवातीला तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाल्याचे वृत्त आले होते; मात्र आता शत्रूचे हेलिकॉप्टर समजून हवाई दलाकडूनच क्षेपणास्त्र या हेलिकॉप्टरच्या दिशेने डागले गेल्याचे चौकशीत पुढे येत आहे. याप्रकरणी एका वरिष्ठ अधिकाºयावर वायुसेनेने कारवाईदेखील केल्याचे समजते.


देशाचा सैनिक सहजासहजी घडत नसतो. स्क्वॉड्रन लीडर या पदावरील अधिकारी घडविण्यासाठी मोठा कालावधी लागतो. त्यासाठी कठोर परिश्रम वायुदलाला घ्यावे लागतात. त्यामुळे निनादच्या रूपाने आमच्या कुटुंबासह देशाचे मोठे नुकसान झाले आहे, अशा प्रतिक्रिया त्यांच्या वडिलांनी व्यक्त केली. निनाद यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले, त्याच्या दुसºया दिवशी वायुसेनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घरी पुन्हा भेट देऊन निनाद यांच्या हेलिकॉप्टर दुर्घटनेविषयी माहिती दिली होती, असे मांडवगणे यांनी सांगितले. वायुसेना एक कुटुंबाप्रमाणे असून, मुलगा गमावल्याचे जसे दु:ख आम्हाला आहे, तसे भारतीय वायुसेनेलाही उत्तम वैमानिक गमावल्याचे दु:ख असल्याचे मांडवगणे म्हणाले.

यंत्रणेचा समन्वय चुकला
यंत्रणेमध्ये योग्य समन्वय घडून आला नाही आणि बॉम्बगोळा डागला गेला, अशी चुकीची पुनरावृत्ती यापुढे कधीही होता कामा नये, जेणेकरून विनाकारण शूरवीरांना वीरमरण येणार नाही, असे मत मांडवगणे यांनी व्यक्त केले. शहीद निनाद व त्यांचे सहकारी दोन मिशन पूर्ण करून तिसºया मिशनवर होते. मात्र याचवेळी यंत्रणेमधील समन्वयाच्या अभावाने त्यांना वीरमरण आले.

Web Title: ... such a mistake should not happen again - murmur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.