शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

फक्त कायदे करुन असे गुन्हे थांबवता येणार नाही; पुणे अत्याचार प्रकरणावर चंद्रचूड यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 19:56 IST

'निर्भया प्रकरणानंतर सुधारणा झाली पण...', माजी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांची मोठी मागणी

Pune Bus Rape Case: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात बुधवारी एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी या घटनेवरून सत्ताधारी महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी फरार आरोपीला पकडण्यासाठी 1 लाखाचे बक्षीस जाहीर केले आहे. दरम्यान, या प्रकरणावर भारताचे माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांची प्रतिक्रिया आली आहे.

माजी सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड गुरुवारी (27 फेब्रुवारी ) म्हणाले की, निर्भया प्रकरणानंतर कायद्यांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या, मात्र असे गुन्हे केवळ कायदे करून थांबवता येणार नाहीत. महिलांसाठी बनवलेल्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी झाली पाहिजे. महिला जिथे जातील तिथे त्यांना सुरक्षित वाटले पाहिजे. अशा प्रकरणांमध्ये योग्य तपास, कठोर कारवाई, जलद सुनावणी आणि शिक्षा आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. 

दरम्यान, विरोधी पक्षांनी या घटनेची 2012 च्या दिल्ली निर्भया घटनेशी तुलना केल्याने सरकारवर दबाव वाढला आहे. आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (37) याला पकडण्यासाठी पोलिसांनी अनेक विशेष पथके तयार केली आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले की, आरोपींचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला 1 लाख रुपयांचे बक्षिसही जाहीर केले आहे.

गुन्हा कसा घडला?स्वारगेट येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे (MSRTC) आगार शहरातील सर्वात मोठे बसस्थानक आहे. पीडितेने सांगितले की, मंगळवारी पहाटे 5:45 वाजता सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जाण्यासाठी बसची वाट पाहत असताना आरोपीने तिला 'दीदी' हाक मारली आणि साताऱ्याची बस दुसऱ्या फलाटावर उभी असल्याचे सांगितले. यानंतर आरोपीने तिला रिकाम्या शिवशाही एसी बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. घटनेनंतर आरोपी फरार झाला.

तपास व पुढील कारवाईसीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. एमएसआरटीसी प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे. या प्रकरणामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. दोषीला लवकरात लवकर अटक करून जलद न्याय मिळवून देण्यासाठी शासन आणि पोलीस प्रशासनावर दबाव वाढत आहे.

परिवहन मंत्री काय म्हणाले?बस प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बसस्थानकावर असलेल्या सुरक्षा रक्षकांमध्ये महिला सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविण्याची सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिली आहे. याबरोबरच बसस्थानक परिसरातील निर्लेखित बसची विल्हेवाट लावण्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची वेळ दिली आहे. राज्य परिवहन महामंडळाकडे मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी पद असून, या रिक्त पदावर भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. याबाबत प्रस्ताव गृह विभागाला विनाविलंब सादर करण्याची सूचनाही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. 

टॅग्स :DY Chandrachudडी. वाय. चंद्रचूडswargate bus depotस्वारगेट बसस्थानकCrime Newsगुन्हेगारीPuneपुणे