शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

भाजप आंदोलन करतंय? कसलं?; एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल; संजय राऊतांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 12:11 IST

"यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. ते वळवळत असतात सारखे."

आज महाराष्ट्राची राजधानी मुंबई राजकीय मोर्चांनी दणाणत आहे. येथे शिंदे-फडणवीस सरकारला टार्गेट करण्यासाठी, एकीकडे विरोधी पक्षांचा, म्हणजेच महाविकास आघाडीचा मोर्चा निघाला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून सत्ताधआरी पक्षही 'माफी मांगो' आंदोलन करत आहे. यातच भाजपच्या माफी मांगो आंदोलनावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी तिखट शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. "एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल," असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल... -यावेळी पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले, "भाजप आंदोलन करत आहे? कसलं? आम्ही महाराष्ट्रप्रेमी म्हणून रस्त्यावर उतरलोय म्हणून भाजप आंदोन करतय का? एवढा मूर्ख पक्ष जगाच्या पाठीवर झाला नसेल. आज, आपण बघत आसाल, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याबद्दल, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाल्याबद्दल आणि महात्मा फुले यांचा अपमान झाल्याबद्दल महाराष्ट्रातील जनता रस्त्यावर उतरली आहे. खरं म्हणजे भाजपने, महाराष्ट्राच्या मुंख्यमंत्र्यांनीही रस्त्यावर उतरायला हवे. ते आम्हाला आडवतायत. इतकं निर्लज्ज सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालं नसेल."

यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू -"डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे सुपूत्र आहेत. ही माहिती चुकीची आहे का? यांची डोकी तपासायला पाहीजे. यांच्या डोक्यात गांडुळाचा मेंदू आहे. ते वळवळत असतात सारखे." एवढेच नाही तर, सरकार आपली मागणी पूर्ण करेल का, असा प्रश्न एका पत्रकाराने विचारला असता, "सरकारने आमची मागणी पूर्ण करो अथवा न करो. ही महाराष्ट्राची शक्ती आहे. ती दिल्लीला दाखवण्यासाठी हा मोर्चा आहे. महाराष्ट्रात म्हणतात निर्लज्ज सरकार. या सरकारमध्ये दम नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान होऊन, जे राज्यपालांना हटवत नाही. त्यांच्यावर काय बोलणार? जनता उत्तर देईल," असेही राऊत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेagitationआंदोलनMahavikas Aghadiमहाविकास आघाडीShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिनBJPभाजपा