खंडाळ्यात दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात यश
By Admin | Updated: July 23, 2016 17:12 IST2016-07-23T17:03:35+5:302016-07-23T17:12:48+5:30
खंडाळ्यातील व्हँली रीना हॉटेलच्या मागील दरीत पडलेल्या एका ५० वर्षीय पर्यटकाला वाचविण्यात शिवदुर्ग मित्रच्या रेस्कू पथकाला यश आले

खंडाळ्यात दरीत पडलेल्या पर्यटकाला वाचविण्यात यश
>ऑनलाइन लोकमत -
लोणावळा, दि. २३ - खंडाळ्यातील व्हँली रीना हॉटेलच्या मागील दरीत पडलेल्या एका ५० वर्षीय पर्यटकाला वाचविण्यात शिवदुर्ग मित्रच्या रेस्कू पथकाला यश आले. शनिवारी सकाळी ७ वाजता हे बचावकार्य करण्यात आलं.
खंडाळ्यातील गिरीजा हॉटेलमध्ये ऐरोली मुंबई येथिल २ पर्यटक शनिवारी पहाटे आले होते. ते दारुच्या नशेत होते. त्यापैकी मयांक त्रिवेदी नावाचा पर्यटक दरीत खाली उतरत असताना पडला. मांडीजवळ पाय फँक्चर झाल्याने तो जोरजोरात ओरडत होता. ओरडण्याचा आवाज ऐकून आजुबाजुचे लोक, खंडाळा पोलीस स्टेशनचे सचिन शिंदे व सकाळी खंडाळ्यातील शनी मंदिरात दर्शनाला गेलेले शिवदुर्गचे सल्लागार अँड. संजय वांद्रे यांनी धाव घेतली.
संजय वांद्रे यांनी तातडीने त्यांच्या शिवदुर्ग रेस्कू पथकाला बोलावत मयांक यांना दरीतून बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करत अर्ध्या तासात त्याला दरीतून बाहेर काढत जीवदान दिले. बचावकार्य राबविणाऱ्या टिममध्ये आज अँड. संजय वांद्रे ,बी. के. वाशिलकर , अजय पाँन, अशोक मते, राजेंद्र कडु, रोहीत वर्तक , तन्मय वांद्रे , सुनिल गायकवाड हे होते.