राजमाची किल्ला परिसरात भरकटलेल्या १९ जणांना शोधण्यात यश
By Admin | Updated: August 1, 2016 09:45 IST2016-08-01T08:30:02+5:302016-08-01T09:45:47+5:30
राजमाची किल्ला परिसरात रविवारी रँपलिंगसाठी आलेले १९ पुमेकर भरकटले, मात्र त्यांना शोधण्यात यश मिळाले आहे.

राजमाची किल्ला परिसरात भरकटलेल्या १९ जणांना शोधण्यात यश
>ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. ०१ - राजमाची किल्ला परिसरातील कातळदरी वाँटरफाँल येथे रविवारी रँपलिंगसाठी पुण्यातून आलेला १९ जणांचा ग्रुप नियोजनाअभावी राजमाची परिसरातील जंगलात भरकटला होता. त्यांच्याजवळ साध्या बँटर्या सुध्दा नसल्याने ते रात्री जंगलात सैरभैर भटकत होते मात्र त्यांना वाट सापडत नव्हती. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकाला फोन आल्यानंतर शिवदुर्गचे सुनिल गायकवाड, रोहीत वर्तक, अमोल परचंड, महेश मसणे, समिर जोशी, सागर पाठक, ब्रिजेश ठाकुर, गणेश गायकवाड, ओंकार पवार, प्रणय अंभोरे, अनुराग यादव, विकास मावकर, प्रविण देशमुख, अजय शेलार यांच्या टिमने राजमाचीकडे रात्री कुच करत आवाज व मोबाईल लाईटच्या सिंगनलच्या सहाय्याने मध्यरात्री दिड वाजण्याच्या सुमारास ह्या सर्व १९ जणांना सुखरुप लोणावळ्यापर्यत आणले. लोणावळा परिसरात शनिवारी रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. मात्र पावसाची व अंधराची तमा न बाळगता शिवदुर्गने प्रसंगावधान राखत भरकटलेल्या पर्यटकांना शोधण्यासाठी शिकस्त केली. विशेष म्हणजे राजमाचीकडे जाण्यासाठी वाहनांना पावसाळ्यात पुर्ण अंतरावर रस्ता नसल्याने शिवदुर्गची ही टिम काही भाग वाहनांनी व उर्वरित पायी जात ही शोध मोहिम राबवली.