शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कौंडण्यपूर विकासासाठी कॅनडा सरकारकडून ५०० कोटी, यशोमती ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2017 6:59 PM

 अमरावती - विदर्भकन्या रुक्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पंढरपूर येथे झालेल्या विकास आराखडा परिषदेमध्ये कौंडण्यपूरची महती सांगताना यशोमती ठाकूर यांनी विकासाचा पाठपुरावा केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरून कॅनेडाचे वाणिज्य दुतावासातील जॉर्डन ग्रीब्स व टारा शेऊरवॉटर पंढरपूर येथील विकास ...

 अमरावती - विदर्भकन्या रुक्मिणीचे माहेर म्हणून प्रसिद्ध असलेल्या कौंडण्यपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून ५०० कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पंढरपूर येथे झालेल्या विकास आराखडा परिषदेमध्ये कौंडण्यपूरची महती सांगताना यशोमती ठाकूर यांनी विकासाचा पाठपुरावा केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निमंत्रणावरून कॅनेडाचे वाणिज्य दुतावासातील जॉर्डन ग्रीब्स व टारा शेऊरवॉटर पंढरपूर येथील विकास आराखडा परिषदेला उपस्थिती दर्शविली. यावेळी आमदार ठाकूर यांनी कौंडण्यपूरची महती विशद करताना श्रीक्षेत्र कौंडण्यपूर व पंढरपूरचे आध्यात्मिक व ऐतिहासिक महत्त्व पटवून दिले. त्यांचा या प्रयत्नाला कॅनडाच्या प्रतिनिधींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यानुसार कौंडण्यपूरच्या विकासासाठी कॅनडा सरकारकडून ५०० कोटी व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी दोन हजार कोटी रुपये मिळणार आहेत. या परिषदेला सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, आ. भरत भालके, आ. सुधाकर परिचारक, पंढरपूर संस्थानचे अध्यक्ष अतुल राजे भोसले, पंढरपूरचे नगराध्यक्ष, अमरावती जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती जयंत देशमुख यांच्यासह वारकरी व हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ. यशोमती ठाकूर यांच्या पाठपुराव्याने कौंडण्यपूरच्या विकासाला कॅनेडा सरकारकडून आर्थिक मदत मिळणार असल्याने या तीर्थक्षेत्राचा चेहरा-मोहरा पालटणार आहे.

कौंडण्यपूरचे महत्त्व ऐतिहासिक आहे. कॅनेडा शासनाच्या प्रतिनिधींना  पंढरपुरातील परिषदेत ते महत्त्व पटवून दिले. यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही फोनवर सकारात्मक चर्चा झाली.  - यशोमती ठाकूर,आमदार, तिवसा मतदारसंघ

टॅग्स :Governmentसरकार