शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही किंमत कमी केली नसेल तर मला सांगा, मी तिथे येईल; निर्मला सीतारामन यांचे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
3
२२ तास चाललेल्या मिरवणुकीनंतर लालबागचा राजा विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर दाखल
4
Thane: गणपती विसर्जन करताना पाच जण नदीत बुडाले, एकाचा मृतदेह मिळाला; दोघांचा शोध सुरूच
5
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
6
ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट
7
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
8
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
9
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
10
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
11
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
12
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
13
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
14
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
15
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
16
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
17
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
18
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
19
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
20
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!

राज्यात चार हजार १३५ चार्जिंग स्टेशनसाठी नवीन ईव्ही पॉलिसीनुसार सबसिडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 06:33 IST

नव्या योजनेमुळे मिळणार १० लाखांपर्यंत आर्थिक मदत

महेश कोले, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण (ईव्ही पोलिसी) २०२५ ते २०२३ या पाच वर्षांसाठी लागू झाले असून, त्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसोबतच चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी देखील  सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ५० ते २५० किलो व्हॅटपेक्षा (केव्ही) कमी क्षमतेच्या चार्जिंग स्टेशनला पाच लाखांपर्यंत, तर २५० ते ५०० केव्हीच्या चार्जिंग स्टेशनसाठी १० लाखांपर्यंत सूट मिळणार आहे. 

नवीन धोरणानुसार राज्यभरात एकूण चार हजार १३५ सार्वजनिक, निम्न सार्वजनिक तसेच खासगी चार्जिंग स्टेशनसाठी ही सबसिडी देण्यात येणार आहे. शहरी व ग्रामीण भागात, तसेच महत्त्वाच्या महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन सहज उपलब्ध व्हावीत, या उद्देशाने संपूर्ण राज्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानुसार राष्ट्रीय महामार्गावर प्रत्येकी २५ किलोमीटरच्या अंतरावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

चार्जिंग स्टेशनवर चारचाकी

लहान वाहने, बस आणि ट्रकसाठी किमान चार चार्जिंग पॉइंट असणे आवश्यक आहे. 

उद्दिष्टपेक्षा पुण्यात जास्त चार्जिंग स्टेशन

  • २०२१ मध्ये जाहीर केलेल्या ईव्ही पॉलिसीमध्ये फक्त मुंबई आणि पुण्यात चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी सबसिडी जाहीर करण्यात आली होती. परंतु, नव्या पॉलिसीमध्ये सरकारने राज्यव्यापी धोरण अवलंबिले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
  • जुन्या पॉलिसीनुसार मुंबईसाठी दीड हजार आणि पुण्यासाठी ५०० सार्वजनिक, निम्न सार्वजनिक चार्जिंग स्टेशनसाठी, तर खासगी ३७५ स्टेशनसाठी सबसिडी जाहीर केली होती. परंतु, त्यापैकी मुंबईमध्ये ४५२, तर पुण्यात चक्क एक हजार ९७० चार्जिंग स्टेशन उभारण्यात आली.
  • परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन हजार ३७५ चार्जिंग स्टेशनचे उद्दीष्ट नोंदवण्यात आले असताना, तीन हजार ७२८ चार्जिंग स्टेशन उभारली गेली. नवीन इलेक्ट्रिक वाहने पुण्यामध्ये लाँच होत असल्याने असे झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

एका स्टेशनसाठी लागणार खर्च

  • ५० ते २५० केव्ही- १० ते २५ लाख रुपये 
  • २५० ते ५०० केव्ही- २५ ते ५० लाख रुपये

सबसिडी अशी मिळणार

  • ५० ते २५० केव्ही- ५ लाख रुपये
  • २५० ते ५०० केव्ही- १० लाख रुपये
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कार