शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

ग्राहकांना छळणाऱ्या बिल्डरांवर गुन्हे दाखल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 1:01 AM

पैसे देऊनही मालकी न देता विविध कारणे सांगून ग्राहकांचा छळ करणा-या बिल्डरांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आदेश पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.

- राजेश निस्तानेमुंबई : पैसे देऊनही मालकी न देता विविध कारणे सांगून ग्राहकांचा छळ करणा-या बिल्डरांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात यावे, असे आदेश पोलीस महासंचालकांनी राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षकांना दिले आहेत.महासंचालकांच्या वतीने राज्याच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रभात कुमार यांनी हे आदेश जारी केले. महाराष्टÑ सेल, मॅनेजमेंटअँड ट्रान्सफर अ‍ॅक्ट - १९६३, तसेच महाराष्टÑ प्रादेशिक व नगररचनाकायदा १९६६ची (एमआरटीपीअ‍ॅक्ट) काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत बजावण्यात आलेआहे. ओनरशिप फ्लॅट्सअ‍ॅक्टमधील कलम ३ ते १० अंतर्गत विविध बाबी दखलपात्र गुन्ह्यास पात्र ठरतात.पुण्यातील प्रख्यात बिल्डर ‘डीएसके’कडून शेकडो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांनी झालेली फसवणूक सर्वश्रुत आहे. त्याची पुनरावृत्ती होऊ नये. समजा झालीच, तर बिल्डरांवर तत्काळ कारवाई व्हावी, म्हणून सावधगिरीच्या दृष्टीने पोलिसांनी हे आदेश जारी केले आहेत.पोलिसांचा संभ्रम दूरउपरोक्त कायद्यांतर्गत आपल्याला कारवाईचे अधिकार नसल्याचा संभ्रम पोलीस अधिकाºयांमध्ये आहे. दिवाणी प्रकरण म्हणून अनेकदा ग्राहकांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळेच पोलिसांमधील हा संभ्रम दूर व्हावा, फसवणूक झालेल्या, छळ होत असलेल्या ग्राहकांना न्याय मिळावा, बिल्डरांवर तत्काळ गुन्हा दाखल व्हावा, यासाठी महानिरीक्षकांनी हे आदेश जारी केले आहेत.पाच वर्षे शिक्षेची तरतूदमहाराष्टÑ सेल, मॅनेजमेंट अँड ट्रान्सफर अ‍ॅक्टमध्ये १ ते ५ वर्षे शिक्षेची तरतूद असून, त्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत. अनधिकृत बांधकाम करून फसवणूक करणे, ग्राहकांचा विश्वासघात करणे, गृहसंस्था नोंदणी करून न देणे, हस्तांतरण (कन्व्हेयन्स) डीड करून न देणे, याबाबी दखलपात्र गुन्हा असल्याचे प्रभातकुमार यांनी पत्रात नमूद केले.कारवाईच्या तरतुदीकलम ३ : फ्लॅटचा ताबा ठरलेल्या तारखेला न देणे. ताबा देण्यापूर्वी भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त करून न देणे. महानगरपालिकेचे मान्य नकाशे बांधकाम ठिकाणी प्रदर्शित न करणे.कलम ४ : फ्लॅटच्या किमतीच्या २० टक्केपेक्षा कमी आगाऊ रक्कम घेऊनही लेखी करार करून न देणे.कलम ५ : खरेदीदारांकडून घेतलेल्या आगावू रकमा बँकेत स्वतंत्र खाते उघडून त्यात न ठेवणे.कलम ७ : नकाशाप्रमाणे बांधकाम नसणे. जास्त माळे बांधणे.कलम १० : बिल्डरने चार महिन्यांत सहकारी सोसायटी (गृहसंस्था) नोंदण्यास अर्ज न करणे.कलम ११ : सोसायटी नोंदणीपासून चार महिन्यांत जमीन व इमारती सोसायटीला हस्तांरित न करणे.

टॅग्स :Crimeगुन्हा