पीकविम्याची रक्कम ७ जूनपूर्वी जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 05:19 IST2018-05-31T05:19:23+5:302018-05-31T05:19:23+5:30

शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम ७ जूनपूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले.

Submit the amount of wages before 7th June, Chief Minister's order | पीकविम्याची रक्कम ७ जूनपूर्वी जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

पीकविम्याची रक्कम ७ जूनपूर्वी जमा करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुंबई : शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीकविम्याची रक्कम ७ जूनपूर्वी जमा झाली पाहिजे याची दक्षता विमा कंपन्यांनी घ्यावी, असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे दिले.
प्रधानमंत्री पीक विम्यासंदर्भात आढावा बैठक मंत्रालयात झाली. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत बैठकीला उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, या वर्षी पावसाळा वेळेवर आणि चांगला होणार असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पेरणीचे आवश्यक ते साहित्य खरेदी करण्यासाठी शेतकºयांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्याचा त्यांना नक्कीच लाभ होईल.
ज्या विमा कंपन्यांची कामगिरी समाधानकारक नाही त्यांनी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकºयांना रक्कम मिळेल यासाठी तत्परता दाखवावी. विमा कंपन्यांनी क्षेत्रियस्तरावर अधिक गतीने काम होण्यासाठी मनुष्यबळदेखील वाढवावे. ज्या खातेधारक शेतकºयांची माहिती पडताळणी होत नाही अशावेळी विमा कंपन्यांनी या खातेदारांची रक्कम संबंधित बँकेकडे जमा करावी, असे निर्देश केंद्र शासनानेदेखील यापूर्वीच दिले आहेत. त्याची अंमलबजावणी व्हावी, असेही मुख्यमंत्र्यांनी
सांगितले.
थेट लाभ हस्तांतरित करण्याकरिता ज्या लाभार्थ्याने बँक खाते उघडले त्याची अद्ययावत माहिती एकाच ठिकाणी जमा होणारी यंत्रणा तयार करता येईल का, जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ वेळेवर लाभार्थ्यांना देणेकामी अडचण निर्माण होणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करावेत असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अधिकाºयांना दिले.
खरीप २०१८साठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून विमा कंपन्या व बँकांनी समन्वयातून शेतकºयांना त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकºयांनी दिलेल्या मुदतीत योजनेत सहभागासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. या वेळी मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव विजयकुमार, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधू, कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, सहकार आयुक्त विकास झाडे, विविध विमा कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

खरीप २०१८साठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली असून विमा कंपन्या व बँकांनी समन्वयातून शेतकºयांना त्याचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावेत. शेतकºयांनी दिलेल्या मुदतीत योजनेत सहभागासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

Web Title: Submit the amount of wages before 7th June, Chief Minister's order