शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आकारिक, संकलित मूल्यमापनाने विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2021 07:26 IST

इयत्ता पहिली ते आठवीसाठी निर्णय

मुंबई : आकारिक आणि संकलित मूल्यमापन प्रक्रिया वापरून इयत्ता पहिली ते आठवीच्या तब्बल १ कोटी ४६ लाख ८६ हजार ४९३ विद्यार्थ्यांना वर्गोन्नती म्हणजे थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) राज्यातील शाळा व स्थानिक प्रशासनांना दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याही कारणास्तव वरील दोन्ही मूल्यमापन होऊ शकेलेले नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना वर्गोन्नत करावे आणि त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई कायदा २००९ कलम १६ वर्गोन्नत असा शेरा नमूद करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय इतर कोणताही शेरा या विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावर देण्यात येऊ नये, असे एससीईआरटीने स्पष्ट केले.यंदाच्या शैक्षणिक वर्षात पहिली ते चौथीच्या शाळा प्रत्यक्ष सुरू करता आल्या नसल्या तरी शिक्षकांनी ऑनलाइन शिकवले. राज्याच्या बहुतांश ठिकाणी थोड्या महिन्यांकरिता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरु करून तेथे प्रत्यक्ष शिक्षण झाले. दरम्यान, पहिली ते आठवीच्या अनेक शाळांमध्ये आकारिक मूल्यमापन केले गेले. काही शाळांनी संकलित मूल्यमापनही केले. या पार्श्वभूमीवर एससीईआरटीने या मूल्यमापन पद्धतींचा अवलंब करून विद्यार्थ्यांना वर्गोन्नती द्यावी असे म्हटले आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फक्त आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण केली आहे, अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आकारिक मूल्यमापनामधील विद्यार्थ्यांची क्षमता लक्षात घेता त्याचे रुपांतर १०० गुणांमध्ये करावे व त्यानुसार विद्यार्थ्याची श्रेणी निर्धारित करावी, अशा सूचना केल्या आहेत.एससीईआरटीच्या या मार्गदर्शक सूचनांमुळे सर्व प्रकारच्या स्थलांतरित विद्यार्थ्यांनाही न्याय मिळू शकेल, असे मत शिक्षणतज्ज्ञांनी मांडले.शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी कृती कार्यक्रमएससीईआरटीकडून नमूद करण्यात आल्याप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांचे कोणत्याच प्रकारचे मूल्यमापन होऊ शकले नाही, त्यांच्या प्रगतिपुस्तकावर आरटीई शेरा असेल. मात्र, अशा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे, असे म्हटले आहे. तसेच एससीईआरटीकडून विकसित करण्यात आलेल्या विद्यार्थी मित्र पुस्तिकांची मदत घेण्यात यावी, सोबत नियमित वर्ग शिकवणीची प्रक्रियाही पूर्ण करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी एससीईआरटीई कृती कार्यक्रम तयार करणार असून, त्याच्या सूचना स्वतंत्र देण्यात येतील.आकारिक व संकलित मूल्यमापन म्हणजे काय?आकारिक मूल्यमापनामध्ये निरीक्षण हा महत्त्वाचा घटक असून, शाळांमध्ये वर्षभरात होणारे विविध उपक्रम, तोंडी परीक्षा, प्रकल्प, प्रयोग, वर्गकाम यांचे मूल्यमापन केले जाते. तर, संकलित मूल्यमापनामध्ये वर्षभरातील विद्यार्थ्यांच्या लेखी, तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षा यांचे मूल्यमापन केले जाते.

टॅग्स :Educationशिक्षण