शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

नीट पदव्युत्तर अभ्यासक्रमास आता ५ पर्सेंटाइलवर पात्रता, राष्ट्रीय परीक्षा मंडळाची नोटीस प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 17:01 IST

सांगली : नीट पीजी-२०२४च्या परीक्षेत पाच पर्सेंटाइल गुण मिळविणारे विद्यार्थीदेखील आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायला पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय ...

सांगली : नीट पीजी-२०२४च्या परीक्षेत पाच पर्सेंटाइल गुण मिळविणारे विद्यार्थीदेखील आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायला पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय परीक्षा मंडळाने नुकतेच याबाबतची नोटीस प्रसिद्ध केली असून खुला गट, विमुक्त जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि आर्थिकदृष्ट्या मागास आदी सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी या निर्णयाचा लाभ मिळेल.दरवर्षी खुला गट व आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना ५० पर्सेंटाइल तर इतर सर्व राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ४० पर्सेंटाइल गुणांची आवश्यकता असते.याआधीही ४ जानेवारी २०२५ रोजी तिसऱ्या प्रवेश फेरीपूर्वी पात्रता टक्केवारी कमी करण्यात आली होती. खुल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना १५ पर्सेंटाइल तर राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना १० पर्सेंटाइल गुण आवश्यक करण्यात आले होते. त्यानंतर आता चौथ्या फेरीनंतर हे पात्रता गुण आणखी कमी करण्यात आले आहेत. गतवर्षी अशाच पद्धतीने शून्य पर्सेंटाइल गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनादेखील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पात्र ठरविण्यात आले होते.

अनाटॉमी, फिजिओलॉजी, मायक्रोबॉयोलॉजीसारख्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी फारसे इच्छुक नसतात, त्यामुळे अनेक राज्यांतील खासगी महाविद्यालयातील या विषयाच्या जागा रिक्त राहत असल्याने हे पात्रता गुण घटवणे भाग पडते. ज्या अभिमत विद्यापीठाची फी खूप अधिक आहे, अशा ठिकाणीही जागा शिल्लक राहतात. शेवटच्या टप्प्यात आता किती जागा शिल्लक राहतात, यावरून विद्यार्थ्यांना संधी मिळेल. -डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली

टॅग्स :SangliसांगलीMedicalवैद्यकीयStudentविद्यार्थीexamपरीक्षा