शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडमध्ये विद्यार्थ्यांना दारू पाजण्याचा प्रयत्न, आयुर्वेदिक महाविद्यालयात रॅगिंग; सीनिअर्सकडून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:14 IST

येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २५ जानेवारीला ‘फ्रेशर्स’ पार्टीच्या तयारीसाठी मंगळवारी रात्री सीनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला.

नांदेड : येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात २५ जानेवारीला ‘फ्रेशर्स’ पार्टीच्या तयारीसाठी मंगळवारी रात्री सीनिअर विद्यार्थ्यांनी द्वितीय वर्षातील ९ विद्यार्थ्यांना वसतिगृहातील खोलीवर बोलावून बळजबरीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तोंडावर सिगारेटचा धूर फेकला. रॅगिंगला विरोध केल्याने मारहाण केल्याची तक्रार द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. वजिराबाद पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली आहे.जोरदार मार लागल्याने काही विद्यार्थ्यांना उलट्या झाल्या. चौकशीसाठी हे प्रकरण आता महाविद्यालयातील अ‍ॅन्टी रॅगिंग समितीकडे देण्यात आले आहे़ आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी वसतिगृहात १६ खोल्यांमध्ये ४८ विद्यार्थी राहतात़ काही शहरात राहतात. बीएएमएसच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी सीनिअर्ससाठी २५ जानेवारीला पार्टी ठेवली होती़ त्यासाठी महाविद्यालयाकडून परवानगीही घेतली होती. मात्र त्याआधीच मंगळवारी रात्री वसतिगृहातील सीनिअर्सनी सोमेश कॉलनीतील नऊ विद्यार्थ्यांना पार्टीची तयारी करण्यासाठी वसतिगृहावर बोलावले. तेव्हा एका खोलीत ११ विद्यार्थी दारू पित होते. त्यांनी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडला़ काहींना जबरदस्तीने दारू पाजण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे दोन विद्यार्थ्यांना ओकाºया झाल्या़ रॅगिंगला विरोध करणाºयांना सिनिअर्सनी मारहाण केल्याने विद्यार्थ्यांनी रात्रीच वजिराबाद पोलीस ठाणे गाठले़ त्यानंतर पोलीस महाविद्यालयात गेले. मारहाण झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी चौकशी केली.११ सदस्यीय समितीरॅगिंगच्या चौकशीसाठी महाविद्यालयाने ११ सदस्यीय समिती नेमली आहे. नऊ विद्यार्थ्यांच्या तक्रारी समितीकडे सोपविल्या आहेत़ समितीच्या अहवालानंतर कारवाई करणार असल्याचे अधिष्ठाता डॉ़ श्यामकुंवर यांनी सांगितले़आवारात दारूच्या बाटल्यामहाविद्यालयाच्या पाठीमागेच विद्यार्थ्यांचे मोडकळीस आलेले वसतिगृह आहे़ वसतिगृह आवारात दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. विशेष म्हणजे वसतिगृहासाठी सुरक्षारक्षक नसल्यामुळे बाहेरची मुले येथे येऊन पार्ट्या करतात, असे विद्यार्थ्यांनी सांगितले़

टॅग्स :Nandedनांदेडcollegeमहाविद्यालयStudentविद्यार्थीPoliceपोलिस