निकालाच्या धास्तीने विद्यार्थ्याची आत्महत्या

By Admin | Updated: June 13, 2017 00:42 IST2017-06-13T00:42:40+5:302017-06-13T00:42:40+5:30

निकालाच्या धास्तीपोटी पाटीलनगर येथील दहावीच्या विद्यार्थ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़ कौस्तुभ कालिदास मुंगेकर

Student's Suicide | निकालाच्या धास्तीने विद्यार्थ्याची आत्महत्या

निकालाच्या धास्तीने विद्यार्थ्याची आत्महत्या

- लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : निकालाच्या धास्तीपोटी पाटीलनगर येथील दहावीच्या विद्यार्थ्याने घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली़ कौस्तुभ कालिदास मुंगेकर (१५, रा़ कालिका पार्क, पाटीलनगर, सिडको) असे त्याचे नाव आहे़
कौस्तुभ हा तिडके कॉलनीतील सेंट फ्रान्सिस शाळेत शिक्षण घेत
होता. त्याने दहावीची परीक्षा
दिली होती़ परीक्षेत नापास
होण्याची भीती कौस्तुभला वाटत होती, त्यातूनच त्याने जीवन
संपविले, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली. एकुलता एक मुलगा गेल्याने मुंगेकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Web Title: Student's Suicide