शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Students Protest: 'आंदोलनात चुकीची माणसे घुसली, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही'- बच्चू कडू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2022 16:34 IST

आज राज्यात अनेत ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्याच्या मागणीसाठी हजारो विद्यार्थ्यांनी आंदोलन केले.

मुंबई: दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनऐवजी ऑनलाईन घ्याव्यात, या मागणीसाठी हजारो विद्यार्थी राज्यभरात आज रस्त्यावर उतरले. मुंबई, नागपूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आणि अकोलासह विविध शहरांत विद्यार्थ्यांसह काही कार्यकर्त्यांनी ऑफलाईन परीक्षेला तीव्र विरोध केला. दरम्यान, राज्य शिक्षणमंत्री बच्चू कडू यांनी याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

'विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ'एबीपी माझाशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, काही विद्यार्थी रस्त्यावर आले म्हणजे सगळ्या विद्यार्थ्यांचे हेच मत आहे, असे नाही. विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काही चूकीचे लोकही असतील असे माझे मत आहे. याची आता चौकशी केली जाईल आणि आंदोलनातील मागण्यांवर चर्चाही करुन विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईल. परीक्षा ऑनलाईन घ्यायची की ऑफलाईन हे ठरवण्यासाठी कोणालाही सल्ला द्यायची गरज नाही. हे निर्णय शिक्षण विभाग घेईल, असंही ते म्हणाले.

'विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही'ते पुढ म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या आंदोलनात शिक्षणाशी काहीही संबंध नसणारी काही चूकीची माणसं घुसली आहेत. या सर्वाच्या मागे कोण आहे याचा शोध घेऊ आणि आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांची योग्य चौकशी करू, त्यांच्या शालेय जीवनावर कोणताही दुष्पपरिणाम होऊ देणार नाही. तशा सूचना पोलिसांना देऊ, असं बच्चू कडू म्हणाले.

अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे आंदोलनआज अचानक राज्यात अनेत ठिकाणी दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात या मागणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले. नागपूर, औरंगाबाद, मुंबई आणि उस्मानाबादमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुंबईत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोरही हजारो विद्यार्थ्यांनी निदर्शने केली. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी आल्याने पोलिसांचाही काहीकाळ गोंधळ उडाला. दरम्यान, विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.

टॅग्स :Studentविद्यार्थीBacchu Kaduबच्चू कडूMumbaiमुंबईAurangabadऔरंगाबादnagpurनागपूर