शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
2
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
3
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
4
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
5
दिव्या खोसलासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर भूषण कुमार यांनी सोडलं मौन; म्हणाले...
6
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
7
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
8
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
9
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
10
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
11
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
12
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
13
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
14
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
15
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
16
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
17
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
18
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
19
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
20
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स

विद्यार्थिनी शिकतेय स्वत:चीच कविता

By admin | Published: April 25, 2016 4:59 AM

‘झाड देते माया, झाड देते छाया...’ ही कविता इयत्ता सहावीच्या नव्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे.

अविनाश साबापुरे,

यवतमाळ- ‘झाड देते माया, झाड देते छाया...’ ही कविता इयत्ता सहावीच्या नव्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, याची कवयित्रीदेखील इयत्ता सहावीतीलच असून, यवतमाळनजीकच्या कापरा मेथड गावातील आहे. सोनाली श्रावण फुपरे असे या कवयित्रीचे नाव आहे. नव्या शैक्षणिक सत्रासाठी इयत्ता सहावीचा नवा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यात यवतमाळपासून १८ किलोमीटर अंतरावरील कापरा मेथड या डोंगर आणि जंगलव्याप्त गावातील सोनालीची कविता समाविष्ट करण्यात आली आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने सहावीसाठी मराठीचे पाठ्यपुस्तक तयार करताना, या पुस्तकात सहाव्या वर्गातीलच एका विद्यार्थ्याची कविता घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी राज्यभरातील शाळांना आवाहन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या कविता मागविण्यात आल्या होत्या. राज्यभरातून हजारो विद्यार्थ्यांच्या कविता शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आल्या. केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या सोनाली फुपरे या एकमेव विद्यार्थिनीची कविता निवडण्यात आली, अशी माहिती भाषाविषयक अभ्यासक्रम समितीचे सदस्य समाधान शिकेतोड, विजय राठोड यांनी दिली.>चला, कविता करू या !मराठीच्या नव्या पुस्तकात ‘चला, कविता करू या’ हा पाठ्यक्रम आहे. त्यात सोनालीची ‘झाड’ ही कविता देण्यात आली आहे. त्याखाली ‘सोनालीप्रमाणेच आपणही कविता लिहू या’ अशी सूचनाही विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आली आहे. त्यामुळे सोनालीची कविता अखिल महाराष्ट्रातील सहाव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरली आहे. सोनाली पाचव्या वर्गापासूनच कविता लिहिते. तिचे वडील श्रावण आणि आई वनिता हे शेती करतात. >झाड देते माया, झाड देते छाया...झाड आहे हिरवेगारवारा देते थंडगारझाडाच्या सावलीत मी बसतेझाड खुदकन् गालात हसतेझाड देते मायाझाड देते छायाझाडावर भरते पक्ष्यांची शाळाझाडाखाली सर्व प्राणी होतात गोळाझाडाला लागतात सुंदर फुलेफुले तोडायला येतात मुलेझाड आहे माझा मित्रमाझ्या मनात राहते नेहमी झाडाचे चित्र- सोनाली श्रावण फुपरे (इयत्ता : सहावी)