शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

रिक्षा विद्यार्थी वाहतुक धोरण दुर्लक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 07:00 IST

राज्यात सर्वत्र विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू

ठळक मुद्देसध्या बहुतेक रिक्षांमधून दुपटीने विद्यार्थी वाहतुक सुरू अनेक वर्षांपासून रिक्षातून विद्यार्थी वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणी

पुणे : शहरातील हजारो विद्यार्थी व पालकांना आधार देणाºया रिक्षांवर बंधने लादली जात आहेत. रिक्षामधून दहा विद्यार्थी सहजपणे प्रवास करू शकतात, याचे प्रात्यक्षिक परिवहन अधिकाऱ्यांसह मंत्र्यांसमोरही करून दाखविले आहे. पण २० वर्षांपासून रिक्षासाठी स्वतंत्र धोरण करण्याचा प्रयत्न केवळ चर्चेच्या पातळीवरच रेंगाळला. त्याचा फटका रिक्षा चालकांना बसत असल्याची भावना रिक्षा संघटनांकडून व्यक्त केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात सर्वत्र विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या रिक्षांवर कारवाई सुरू आहे. मोटार वाहन कायद्यानुसार प्रवासी क्षमतेच्या १.५ पटीने जास्तीत जास्त ५ बारा वर्षाखालील मुले बसु शकतात. मात्र, सध्या बहुतेक रिक्षांमधून दुपटीने विद्यार्थी वाहतुक सुरू असते. ही वाहतुक असुरक्षित असल्याने त्यावर बंदी घालण्याबाबत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवरी सुनावणीदरम्यान परिवहन विभागाने कारवाईबाबत न्यायालयालाआश्वासन दिले आहे. त्यानुसार क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतुक करणाºया रिक्षांवर कारवाई केली जात आहे. या कारवाईला रिक्षा संघटनांकडून विरोध होत आहे. रिक्षातून विद्यार्थी वाहतुक करण्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. त्याअनुषंगाने १९९९ मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्तांनी प्रक्रियाही सुरू केली होती. तीन आसनी रिक्षामधून एकुण १० मुले बसवण्यास परवानगी देण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगत त्यांनी त्यावर सुचना मागविल्या होत्या. पण त्यानंतर पुढे काहीच झाले नाही. तसेच तत्कालीन परिवहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व शिवाजीराव मोघे यांच्या काळात याबाबत चर्चा झाली. रिक्षा संघटनांकडून वारंवार स्वतंत्र धोरण निश्चित करण्याबाबत पाठपुरावा करण्यात आला. मंत्र्यांसमोर रिक्षामध्ये काही बदल करून १० विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे वाहतुकीबाबत प्रात्यक्षिकही झाले. पण अद्याप त्यावर काहीही निर्णय झाला नाही. परिणामी सध्या रिक्षा चालकांच्या व्यवसायावर गदा येऊ लागली असल्याची खंत संघटनांकडून व्यक्त केली जात आहे.---------------रिक्षातून १० विद्यार्थ्यांची सुरक्षितपणे वाहतुक केली जाऊ शकते. याचे अनेकदा प्रात्यक्षिक करून दाखविले आहे. पण त्याबाबतचे अधिकृत धोरण ठरविले जात नाही. हे धोरण निश्चित न झाल्याने रिक्षा चालकांना फटका बसत आहे. शासनस्तरावरच यापुढेही पाठपुरावा केला जाईल.- नितीन पवार, रिक्षा पंचायत......परिवहन विभागाकडून रिक्षा चालकांवर सरसकट कारवाई केली जात आहे. हे कारवाई कायद्याच्या विरोधात आहे. रिक्षासाठी स्वतंत्र धोरण  करून विद्यार्थी वाहतुकीला अधिकृतपणे मान्यता द्यायला हवी. - बापू भावे, रिक्षा फेडरेशन----------न्यायालयीन लढ्यासाठी बैठकउच्च न्यायालयामध्ये रिक्षांची बाजू मांडली गेली नाही.रिक्षामधून होणारी विद्यार्थी वाहतूक ही फारतर २ ते ४  किलोमीटरपर्यंत केली जाते. लांबच्या अंतरा साठी पालक स्कूल बस निवडतात. न्यायालयाने रिक्षातील विद्यार्थी सख्या जरूर ठरवावी. पण याबाबत रिक्षा चालक न्यायालयात गेलेले नाहीत. यावर रिविजन याचिका दाखल करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी मंगळवारी (दि. १०) भारती विद्यापीठ कात्रज येथे सायंकाळी ६ वाजता रिक्षा चालकांची बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती आरटीएचे माजी सदस्य बाबा शिंदे यांनी दिली

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाTrafficवाहतूक कोंडीStudentविद्यार्थीSchoolशाळा