चुकल्या माकल्या मुलांच्या चांगल्या आयुष्याची धडपड
By Admin | Updated: November 14, 2014 00:13 IST2014-11-14T00:13:51+5:302014-11-14T00:13:51+5:30
अनघड वयात हातून चुका होऊन किंवा कायद्याच्या चौकटी मोडून वाममार्गाला लागलेल्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी बालसुधारगृहात निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत.

चुकल्या माकल्या मुलांच्या चांगल्या आयुष्याची धडपड
पुणो : अनघड वयात हातून चुका होऊन किंवा कायद्याच्या चौकटी मोडून वाममार्गाला लागलेल्या मुलांच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी बालसुधारगृहात निरनिराळे उपक्रम राबविले जात आहेत. सुधारगृहात मुल गेलं म्हणजे त्या ठपक्याने मुल सुधारण्यापेक्षा जास्त बिघडेल, वांड होईल या विचाराला छेद देण्यासाठी सुधारगृहात ही प्रयोग होत आहेत. मुलांच्या हातून चुका घडल्या तरी त्यांना सुधरण्याची संधी आणि त्या दिशेने वाटचाल करता यावी यासाठी बाल न्याय मंडळाच्या सुधारगृहातील मुलांना उपक्रमशील ठेवण्यात येत आहे.
याविषयी बाल न्याय मंडळाचे सदस्य सुनील पाटील यांनी माहिती दिली. बालसुधारगृहात 8 वी ते 1क् वी वयोगटातील मुले सर्वाधिक सापडतात. चांगल्या घरातील मुले ही यात समाविष्ट असतात.
पालक मुलांना उत्तमोत्तम देण्याच्या धडपडीत मात्र भावनिक नाते निर्माण करायचेच विसरुन जातात. त्यामुळेच
मुलांच्या हातून चूका घडत जातात आणि एका टप्प्याला त्यांच्या लक्षात येते की, कोणाचेच यावर ‘वॉच’नाही. मग ती वाहवतच जातात. यासाठी पालकांचे व मुलांचे समुपदेशन केले जाते. तसेच मुले जर वाहनचोरी करत असतील तर त्यांना एखाद्या मेकॅनिककडे प्रशिक्षणासाठी पाठविले जाते. जेणोकरून वाहन हाताळण्याची त्यांची इच्छा भागते आणि ते वाहनदुरूस्तीचे धडे ही घेतात. असे विविध प्रयोग केले जातात.
केवळ मुलांचे समुपदेशन करून चालत नाहीत तर पालकांनाही अनेक गोष्टी समजावून सांगणो गरजेचे असते. आपल्या मुलाने चूक केली हा धक्का पचवून त्याच्याशी सामान्यपणो वागेपर्यत पालकांकडूनही मुलांना गैरवागणूक मिळते. पौगांडवस्थेत सगळ्याच गोष्टी वेगळ्या अर्थाने मुले घेत असतात. त्यामुळे पालकांनाही समजुतीच्या गोष्टी सांगाव्या लागतात. सुधारगृहातून परतलेल्या मुलांना त्यांच्या चुकांची टोचणी करून देण्यापेक्षा चांगल्या भविष्याविषयी कसे बोलावे हे सांगितले जाते. सध्या निरनिराळ्या शाळांमध्ये जाऊन मुले पालकांशी संवाद साधण्याचा प्रय} सुरू आहे. पालकांचे मुलांशी असणारे नाते कसे खुलवायचे याचे साधे टीप्स दिले जात आहेत.
टाटा इन्स्टिटय़ूटच्या मदतीने संगणक प्रशिक्षण देणो, एमएच सीआयीटीचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांचे समुपदेशन करून त्यांना सतत चांगल्या विचारांसाठी प्रोत्साहित केले जाते. जी मुले व्हाईटनर, दारू , तंबाखू किंवा सिगारेटच्या संपर्कात व्यसनात अडकली आहेत. त्यांना येरवडय़ातील व्यसनमुक्ती केंद्राच्या मदतीने व्यसनापासून परावृत्त करण्याचे प्रय} केले जातात. याशिवाय विविध खेळ घेणो, व्यायाम करवून घेतले जातात. - सुनील पाटील,
सदस्य बाल न्याय मंडळ