शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

संशयित माओवाद्यांविरुध्द ठोस पुरावे : पोलीस आयुक्तांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 21:32 IST

पुणे पोसांनी अटक केलेल्या संशयितांचे माओवाद्यांशी संबंध असलेल्याचे ठोस पुरावे आहेत. आतापर्यंत झालेल्या कारवाया आणि यापुढे होणार असलेल्या कारवायांसाठीही हे पुरावे पुरेसे आहेत.

ठळक मुद्देमिळालेल्या मुदतीत प्रतिज्ञापत्र सादर करूसंशयितांविरुद्ध कागदपत्रे, निधी गोळा करणे, विद्यार्थी नक्षलग्रस्त भागात पाठविणे याचे पुरावे शहरी नक्षलवाद आणि त्याच्याशी आरोपींचा संबंध याचे ठोस पुरावे सर्वोच्च न्यायालयात सादर करणार

पुणे : पुणेपोलिसांनी अटक केलेल्या संशयितांचे माओवाद्यांशी संबंध असलेल्याचे ठोस पुरावे आहेत. आतापर्यंत झालेल्या कारवाया आणि यापुढे होणार असलेल्या कारवायांसाठीही हे पुरावे पुरेसे आहेत.  या आरोपींना नजरकैदेत ठेवल्यानंतर मिळालेल्या मुदतीत आम्ही ठोस पुरावे व प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करू, असे पोलीस आयुक्त डॉ़ के. व्यंकटेशम यांनी सांगितले़ पुणे पोलिसांनी अटक केलेल्या डाव्या विचारसरणीच्या पाच जणांना सर्वोच्च न्यायालयाने पोलीस कोठडीऐवजी नजरकैदेत ठेवण्याचे आदेश बुधवारी दिले होते़. त्यानुसार त्यांना त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे़. याबाबत डॉ़ व्यंकटेशम यांनी आतापर्यंत झालेल्या कारवायांवरच पोलीस थांबणार नसून यापुढेही आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता असून त्याचे पुरावेही असल्याचे सूचित केले़.  डॉ़ व्यंकटेशम म्हणाले, प्रत्येकांचा सहभाग, त्यांची भूमिका, कटकारस्थानातील सहभाग, त्याची अंमलबजावणी आणि विचारसरणी कशी पसरावयाची याचे ठोस पुरावे आहेत. त्यांचा सहभाग निश्चित होईल अशा संदर्भातील कागदपत्रे, निधी गोळा करणे, विद्यार्थी नक्षलग्रस्त भागात पाठविणे याचे पुरावे आहेत़. शस्त्र खरेदी संबंधीची चर्चा, पैसे व निधी गोळा करण्यासंबंधीचे संभाषण तसेच शस्त्र खरेदीचे अधिकार कोणाला असावेत,  याबाबत त्यांच्यात झालेल्या चर्चांचे पुरावे पोलिसांकडे आहेत़.. एम ४ या शस्त्रांच्या खरेदी करण्यासाठी वरावरा राव यांच्याकडे अधिकार दिले होते, असे सांगून एम ४ चा फोटोही डॉ़ व्यंकटेशम यांनी यावेळी दाखविला़. ते म्हणाले, एल्गार परिषदेविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करीत असताना त्या वेळी असलेले स्वरुप आणि आता त्याची व्यापी खूप वाढत गेली आहे़. ही सर्व मराठीतून सर्च वॉरंट काढली असली तरी त्यांना हिंदीतून समजावून सांगितली आहेत़. राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याविषयी ठोस पुरावाराजीव गांधी यांच्याप्रमाणे देशातील वरिष्ठ राजकीय नेत्यांना लक्ष्य करण्याच्या कटाविषयी व्यंकटेशम म्हणाले, सीपीआय माओवादी संघटनेच्या वतीने शहरी भागात त्यांची आघाडीची संघटना स्थापन करुन त्या माध्यमातून देशविरोधी कृत्य, लोकशाहीवादी सरकार उलथवून लावण्याकरिता विविध प्रकारे प्रयत्न सुरु आहेत़. राजकीय पदाधिकाऱ्यांना लक्ष्य करुन त्यांना संपविण्यासंबंधीचे कटकारस्थान त्यांनी आखले होते व ते घडविणार होते, त्याचे ठोस पुरावे पोलिसांकडे आहेत़. जप्त केलेल्या साहित्यातून शस्त्र खरेदी, अंमलबजावणी याबाबतचे पुरेसे पुरावे आमच्याकडे आहेत़. जप्त केलेल्या बाबी या फॉरेन्सिक लॅबला पाठविणार आहोत़.या आरोपींना अटक करताना अवमानकारक भाषा वापरल्याचा आरोप केला जात असल्याचे विचारल्यावर त्यांनी सर्व काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी काही बाबी विचारल्या गेल्या असल्याचे सांगितले़. ...................नजरकैद ही पोलिसांना मिळालेली संधी नक्षलवादी चळवळीचे थिंक टँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पाच जणांची पोलीस कोठडी मिळण्यात पोलिसांना अपयश आले असे वाटते का, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी नजरकैद ही पोलिसांना मिळालेली चांगली संधी असल्याचे सांगितले़. पोलिसांना स्थानिक न्यायालयात पोलीस कोठडी मिळाली असती तर त्यासंबंधीचे पुरावे तेथेच सादर करावे लागले असते़. आता याची दखल उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाने घेतल्याने देशभरातील शहरांमध्ये पसरविण्यात येत असलेल्या शहरी नक्षलवाद आणि त्याच्याशी या आरोपींचा असलेला संबंध याचे ठोस पुरावे आता सर्वोच्च न्यायालयात सादर करता येणार आहेत़. त्यातून यांच्या कटकारस्थानांची देशपातळीवर दखल घेतली जाईल़. दुसरीकडे न्यायालयाने त्यांना नजरकैदेत ठेवले असल्याने या काळात त्यांना  हालचाली करता येणार नाहीत़. पोलीस ठोस पुरावा एकत्र करू शकतील, असे त्यांनी सांगितले़.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसArrestअटकCourtन्यायालय