शहरं
Join us  
Trending Stories
1
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
2
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
3
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
4
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
5
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
6
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
7
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
8
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
9
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
10
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
11
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
12
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
13
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात
14
हॉलिवूडची हुल! स्टीव्हन स्पिलबर्गच्या सिनेमात दिसले असते दिलीप प्रभावळकर, किस्सा सांगत म्हणाले...
15
उल्हासनगरात अनोख्या पद्धतीचा निषेध! रस्त्यांवरील खड्ड्यात मनसे पदाधिकाऱ्यानी केली आंघोळ
16
इतकी हिम्मत येते कुठून? शालार्थ घोटाळ्यामधील ५० पैकी ३३ शिक्षकांची सुनावणीलाच दांडी!
17
भयंकर! आरोपीला पकडण्यासाठी आलेल्या पोलिसांच्या टीमवर जीवघेणा हल्ला, अनेक जण जखमी
18
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
20
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?

विनापरवानगी भोंगा लावाल तर होणार कठोर कारवाई; मार्गदर्शक सूचना आज जारी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 07:51 IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले गेले नाहीत तर अशा प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असे आधीच जाहीर केले असून त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच, काही ठिकाणी तणावाच्या घटना घडत आहेत.

मुंबई : धार्मिक स्थळांवर विनापरवानगी भोंगे लावले गेले तसेच निश्चित करून दिलेली आवाजाची (डेसिबल) मर्यादा ओलांडली गेली तर राज्यात कडक कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. भोंग्यांबाबतच्या मार्गदर्शक सूचना लवकरच जारी करण्यात येतील, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरविले गेले नाहीत तर अशा प्रत्येक मशिदीसमोर हनुमान चालिसाचे पठण केले जाईल, असे आधीच जाहीर केले असून त्यावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच, काही ठिकाणी तणावाच्या घटना घडत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी गृहमंत्री वळसे पाटील, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याशी या विषयावर बैठकीत चर्चा केली. भोंग्यांच्या मुद्द्यावर समाजात कोणीही तेढ निर्माण करणार असेल तर कठोर कारवाई करा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.धार्मिक स्थळांवरील भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांची काटेकोर अंमलबजावणी राज्यात करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार धार्मिक स्थळांवर विनापरवानगी भोंगे बसविल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. या भोंग्यांच्या आवाजाची मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेली आहे. ती मर्यादा पाळणेही बंधनकारक असेल आणि मर्यादा ओलांडल्यास कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. रात्री १० ते पहाटे ६ या वेळेत भोंगे सुरू ठेवता येणार नाहीत, असेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले होते.

मार्गदर्शक सूचनांवर आज होणार शिक्कामोर्तब -या बैठकीत राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत मार्गदर्शक सूचना पोलीस महासंचालक आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्यात मंगळवारी होणाऱ्या बैठकीत निश्चित करण्यात येतील व मुख्यमंत्र्यांच्या मान्यतेने त्या जारी करण्यात येतील. भोंग्यांवरून तेढ निर्माण करणाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल.    - दिलीप वळसे-पाटील, गृहमंत्री 

‘त्या’ सभांवर बंदी घाला : पटोले -- केंद्र सरकार आपले अपयश झाकण्यासाठी राज्यात धार्मिक तेढ निर्माण करीत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला असून, अशी तेढ पसरविणाऱ्या सभांवर बंदी घालण्याची मागणी त्यांनी केली. - इंधनदरवाढ, महागाईवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी धार्मिक मुद्दे पुढे करून वातावरण बिघडवण्याचे षड्यंत्र रचले गेले आहे. राज्यातील सामाजिक एकोपा, शांतता, सौहार्द संपवण्याचा जे प्रयत्न करत आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मी हिंदू आहे आणि दररोज हनुमान चालिसा म्हणतो; पण त्याचा कधी गाजावाजा करत नाही, अशी प्रतिक्रिया पटोले माध्यमांशी बोलताना दिली.- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांना याआधी सुपारीबाज म्हटले होते. आता राज यांनी कोणाची सुपारी घेतली आहे हे फडणवीसच सांगू शकतील. 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेState Governmentराज्य सरकारRaj Thackerayराज ठाकरे