शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाला बळ, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी हाती बांधलं शिवबंधन, उद्धव ठाकरे म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 17:30 IST

Chandrahar Patil News: लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठं बळ मिळालं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले प्रख्यात कुस्तीपटू आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधत ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटाला पश्चिम महाराष्ट्रातून मोठं बळ मिळालं आहे. सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक असलेले प्रख्यात कुस्तीपटू आणि डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज हाती शिवबंधन बांधत ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. चंद्रहार पाटील हे आज त्यांच्या हजारो समर्थकांसह उद्धव ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथे आले होते. तिथे उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या हातात शिवबंधन बांधले आणि त्यांच्या गळ्यात शिवसेनेची भगवी शाल आणि भगवा ध्वज देत त्यांच्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याची अधिकृत घोषणा केली.

चंद्रहार पाटील यांना पक्षात प्रवेश दिल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, आज माझी छाती अभिमानाने फुलून आली आहे. छाती किती इंच झाली हे काही मी सांगू शकत नाही. कारण या मर्दाची छाती पाहिल्यानंतर सांगलीत आमच्याशी लढण्याची हिंमत होणार नाही. सध्या पक्षातून पळपुटे नामर्द पळून जात आहेत. पण मर्द शिवसेनेत येत आहेत. शिवसेना ही मर्दांची संघटना आहे. मला लहानपणीचे दिवस आठवले. त्यावेळी मारुती माने हे मातोश्रीवर यायचे. बाळासाहेबांशी बोलायचे तीच परंपरा अजूनही सुरू आहे.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, चंद्रहारजी तुमचं शिवसेनेमध्ये स्वागत आहे. त्यांनी अशी विनंती केली होती की उद्धवजी तुम्ही काही तरी संकेत द्या. आता संकेत काय देणार लोकांनी ठरवलंच आहे, त्याला मी आता काय करणार. जनतेने एकदा संकेत दिल्यावर त्या पलिकडे काय संकेत द्यायचे. गदा आणि मशाल ह्या मर्दाच्या हातात शोभतात. आता ही गदा आणि मशाल हातात घेऊन आपल्याला सांगलीतून एक मर्द दिल्लीत पाठवायचा आहे. आता मी काही जास्त बोलणार नाही. कारण बरीच वर्षे मी सांगतील आलेलो नाही आहे. आता येणार, असं सांगत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेsangli-pcसांगलीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४