शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

केबल तुटल्याने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे काम ठप्प 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 17:00 IST

मंगळवारी राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

ठळक मुद्देराज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून सुमारे आठ ते दहा हजार दस्त नोंदणीडेटाबेस विषयक पीजी बाऊंसरचे काम सुरू असल्याने संकेतस्थळ बंद सर्व्हरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कामकाजावर परिणाम

पुणे: राज्य शासनाच्या आदेशानुसार नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे (आजीआर) कामकाज जानेवारी महिन्यापासून क्लाऊडच्या माध्यमातून सुरू करण्यात आले. मात्र,मंगळवारी (दि.१२) मुंबई येथे महापेजवळ केबल तुटल्याने नेटवर्क कनेक्टिवीटी विस्कळीत झाली.परिणामी विभागाचे संकेतस्थळ बंद पडले. यामुळे सकाळपासून दुपारी चार वाजेपर्यंत विभागाचे कामकाज पूर्णपणे बंद राहिले.मंगळवारी राज्यभरातील दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.राज्य शासनाला सर्वाधिक महसूल मिळवून देणा-या विभागापैकी एक,अशी ओळख असलेल्या नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कामात अनेक अडथळे येत आहेत.पूर्वी सर्व्हरमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या कामकाजावर परिणाम होत होता. त्यामुळे आयजीआर विभागाचे काम क्लाऊडवरून सुरू झाले. परंतु, गेल्या महिन्यात २१ जानेवारी रोजी नेटवर्क कनेक्टिविटी विस्कळीत झाल्याने सकाळीपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संकेतस्थळ पूर्णपणे बंद होते. त्यानंतर मंगळवारी (दि.१२)पुन्हा एकदा महापेजवळ केबल तुटल्याने राज्यातील सर्वच दस्त नोंदणी कार्यालयातील व्यवहार ठप्प झाले. राज्यातील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या माध्यमातून दररोज संकेतस्थळावरून सुमारे आठ ते दहा हजार दस्त नोंदणी होते. परंतु,संकेतस्थळ बंद असल्याने मंगळवारी चार वाजेपर्यंत केवळ ५७८ दस्त नोंदविले गेले. नोंदणी व मुर्द्रांक शुल्क विभागाच्या उपमहानिरीक्षक सुप्रिया करमरकर- दातार म्हणाल्या,सकाळपासूनच संकेतस्थळ धिम्या गतीने सुरू आहे.डेटाबेस विषयक पीजी बाऊंसरचे काम सुरू आहे. त्यात महापे येथे डेटा सेंटरची फायबर केबल तुटल्यामुळे संकेतस्थळ बंद पडले. परंतु,विभागातर्फे दुरूस्तीचे काम सुरू आहे. -----------------------राज्याचे नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे म्हणाले,डेटाबेस विषयक पीजी बाऊंसरचे काम सुरू असल्याने संकेतस्थळ बंद आहे.परंतु,याबाबतचे काम लवकरच पूर्ण करून संकेतस्थळ सुरळीतपणे सुरू केले जाईल.

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइन