मालेगावी जमावाकडून रास्ता रोको; दगडफेक
By Admin | Updated: November 10, 2014 04:15 IST2014-11-10T04:15:19+5:302014-11-10T04:15:19+5:30
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव तातडीने निवळण्यात यश आले. कॅम्परोडवरील एकात्मता चौकात संतप्त जमावाने घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले

मालेगावी जमावाकडून रास्ता रोको; दगडफेक
मालेगाव : अज्ञात समाजकंटकांनी व्हॉट्स अॅपवर महापुरुषाच्या प्रतिमेची विटंबना केल्याच्या निषेधार्थ संतप्त जमावाने रास्ता रोको करीत दगडफेक केल्याने मालेगावातील कॅम्परोडवर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता.
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने तणाव तातडीने निवळण्यात यश आले. कॅम्परोडवरील एकात्मता चौकात संतप्त जमावाने घोषणाबाजी करत रास्ता रोको आंदोलन केले; अचानक झालेल्या या आंदोलनामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. जमावाने दगडफेक केल्याने वाहनांच्या काचा फुटल्या. दुकानांचेही यात नुकसान झाले. दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात येत असताना पोलिसांचा फौजफाटा दाखल होत परिस्थिती आटोक्यात आणली. (प्रतिनिधी)