नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याचे थांबवा, मुख्यमंत्र्याचा आदेश
By Admin | Updated: July 17, 2016 14:17 IST2016-07-17T14:17:10+5:302016-07-17T14:17:10+5:30
नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहिम थांबवण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना तूर्तास दिलासा दिला आहे.

नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याचे थांबवा, मुख्यमंत्र्याचा आदेश
ऑनलाइन लोकमत
नवी मुंबई, दि. १७ : नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याची मोहिम थांबवण्याचे आदेश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनधिकृत इमारतीतील रहिवाशांना तूर्तास दिलासा दिला आहे. वर्षा बंगल्यावर नवी मुंबईच्या भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यातील चर्चेनंतर नवी मुंबईतील अनधिकृत बांधकामं पाडण्याच्या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी तूर्तास स्थगिती दिली आहे.
पावसाळ्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरवण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यंमंत्र्यांच्या आदेशानंतर उद्याचा बंद मागे घेण्यात आला आहे.