निकृष्ट औषधांची विक्री थांबता थांबेना

By Admin | Updated: January 20, 2015 01:36 IST2015-01-20T01:36:09+5:302015-01-20T01:36:09+5:30

अन्न व औषधी प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतरही राज्यात निकृष्ट औषधांची विक्री थांबलेली नाही उलट ती दरवर्षी वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे स्वत:च प्रशासन काळजीत पडले आहे.

Stop selling scarce medicines | निकृष्ट औषधांची विक्री थांबता थांबेना

निकृष्ट औषधांची विक्री थांबता थांबेना

श्रीनारायण तिवारी - मुंबई
अन्न व औषधी प्रशासनाने अनेक प्रयत्न केल्यानंतरही राज्यात निकृष्ट औषधांची विक्री थांबलेली नाही उलट ती दरवर्षी वाढतच चालली आहे. या प्रकारामुळे स्वत:च प्रशासन काळजीत पडले आहे.
अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राचा अन्न व औषध प्रशासन विभाग बराच कार्यक्षम समजला जातो तरीही खूप वरपर्यंत हात पोहोचलेल्या औषध निर्मात्या कंपन्यांनापुढे त्याने हात टेकले आहेत. अशा कंपन्यांचे हा विभाग काहीही बिघडवू शकलेला नाही. अशा कंपन्यांकडूनच निकृष्ट दर्जाच्या औषधांचा ओघ सुरूच आहे. एफडीए जास्त कार्यक्षम व कठोर होताच काही दिवस त्या औषधांचा पुरवठा कमी होतो व थोड्याच दिवसांत तो पूर्ववत होतो.
एफडीएची चिंता वाढली
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एफडीएने २०१४ च्या एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान जेवढे नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यातील ११.१२ टक्के नमुने निकृष्ट दर्जाचे निघाले. २०१२-२०१३ मध्ये राज्यात एकूण ७५३८ औषधांचे नमुने घेण्यात आले होते त्यातील ३६० नमुने (४.७७ टक्के) निकृष्ट निघाले.
२०१३-२०१४ मध्ये ६०९७ औषधांच्या नमुन्यांपैकी ४६४ (७.६४ टक्के) नमुने निकृष्ट निघाले. गेल्या वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान २५४३ नमुने घेण्यात आले होते त्यापैकी २८३ निकृष्ट दर्जाचे निघाले. निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण दरवर्षी वाढत चालले असल्यामुळे आरोग्य मंत्रालयाची काळजी वाढली आहे. औषधेच जर चांगली नसतील तर रोगी बरा कसा होणार, असा आरोग्य मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा प्रश्न आहे. रोगी बरा झाला नाही तर डॉक्टरांना दोष दिला जातो.
उपाययोजनेची तयारी
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाजारात निकृष्ट दर्जाच्या औषधांचे प्रमाण फार मोठे असल्याच्या तक्रारी येत असल्याचे मान्य केले. आमचे अधिकारी औषधांच्या नमुन्यांची तपासणी करीत आहेत. या गोष्टीवर आणखी लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज असून नवी उपाययोजना केली जात असल्याचे भापकर म्हणाले.

च्आरोग्य मंत्रालयानुसार एफडीएचे निकष न पाळणारी औषधे बाजारातच येऊ शकत नाहीत. जर अशी औषधे कोणाला फुकट वाटायची असतील तरी त्याला तसे करता येत नाही. असे करताना जर कोणी पकडला गेला तर त्याला शिक्षा होऊ शकते, कारण असे करणे हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा आहे. यामुळे एफडीए वेळोवेळी मेडिकल स्टोअर्सची तपासणी करून त्यांच्याकडील औषधांचे नमुने घेत असते.

च्या नमुन्यांची तपासणी एफडीए मुंबई व औरंगाबादेतील आपल्या प्रयोगशाळेतून करून घेत असते. संशय असलेल्या औषधाचा नमुना प्रसिद्ध असलेल्या जवळच्या प्रयोगशाळेत पाठवून त्याची पुन्हा तपासणी केली जाते. जे नमुने तपासणीत नापास होतात त्या बॅचची सगळी औषधे बाजारातून परत मागवून घेतली जातात व संबंधित कंपनीविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाते.

Web Title: Stop selling scarce medicines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.