रामदेवबाबा विरोधात चेंबूर येथे रास्ता रोको

By Admin | Updated: May 10, 2014 01:24 IST2014-05-09T22:48:12+5:302014-05-10T01:24:26+5:30

दलित महिलांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेले वादग्रस्त विधान आणि दलितांवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ चेंबूर येथे आज रिपाइंच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला.

Stop the road in Chembur against Ramdev Baba | रामदेवबाबा विरोधात चेंबूर येथे रास्ता रोको

रामदेवबाबा विरोधात चेंबूर येथे रास्ता रोको

मुंबई : दलित महिलांबाबत योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेले वादग्रस्त विधान आणि दलितांवर होणार्‍या अत्याचाराच्या निषेधार्थ चेंबूर येथे आज रिपाइंच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. या वेळी काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलिसांनी सोडून दिले.
काही दिवसांपूर्वीच लखनौ येथे योगगुरू रामदेव बाबा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना उद्देशून दलित महिलांबाबत संतापजनक विधान केले होते. तसेच नगर जिल्‘ातील खर्डा येथील हत्या करण्यात आलेल्या नितीन आगे या तरुणाच्या कुटुंबीयांना न्याय देण्यात राज्य सरकार कुचकामी ठरत असल्याने सरकारच्या निषेधार्थ ईस्टर्न फ्री वेवर हा रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे सायन-ट्रॉम्बे मार्गावर आणि ईस्टर्न फ्री वेवर १५ ते २० मिनिटे वाहतूक कोंडी झाली होती.

Web Title: Stop the road in Chembur against Ramdev Baba