सावत्र मुलाने आईचे केस कापून अंगावर टाकले रॉकेल
By Admin | Updated: August 1, 2016 09:28 IST2016-08-01T09:28:15+5:302016-08-01T09:28:32+5:30
आपल्या पतीकडे मला का नांदवत नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या सावत्र मुलाने मारहाण करत तिच्या डोक्यावरचे केस कात्रीने कापून तिच्या अंगावर रॉकेल ओतले.

सावत्र मुलाने आईचे केस कापून अंगावर टाकले रॉकेल
>
ऑनलाइन लोकमत
बीड, दि. १ - आपल्या पतीकडे मला का नांदवत नाही, असा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या सावत्र मुलाने मारहाण करत तिच्या डोक्यावरचे केस कात्रीने कापून तिच्या अंगावर रॉकेल ओतले. पेटवून देण्याच्या उद्देशाने तो काडीपेटी शोधत असतानाच आजुबाजुचे लोक गोळा झाल्याने मोठा अनर्थ टळला. यासंदर्भात पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे.
,शहरातील बार्शी नाकापरिसरात राहणाऱ्या मसुराबाई या ४२ वर्षाच्या महिलेसोबत पंचवीस वर्षापूर्वी शेख वाहेद शेख गलाब याने दुसरा विवाह केला होता. वर्षभरापासून या दोघांमध्ये • भांडण होत होते. त्यानंतर हा वाद न्यायालयात गेल्यावर शेख याने आपण मसुराबाईला व्यवस्थित नांदवू आणि त्रास देणार नाही, असे लेखी दिले होते. परंतु गेली सहा महिन्यापासून शेख तिच्याकडे येत नसल्याने रविवारी रात्री ती शेख याच्या घरी जाब विचारण्यासाठी गेली होती. मला नांदवत का नाही आणि मला दुसरीकडे का राहयला सांगतोस, असे तिने त्याला विचारल्यावर शेख याच्या पहिल्या पत्नीचा मुलगा शेख शाहेद याने मसुराबाईला मारहाण करण्यास सुरूवात केली. अश्लिल शिवीगाळ करत तो घरात गेला आणि प्लॅस्टीकच्या बाटलीतून त्याने रॉकेल आणून तिच्या अंगावर ओतले. कात्रीने तिच्या डोक्यावरचे केसही कापूृन टाकले. तो तिला पेटवून देण्यासाठी काडीपेटी शोधत असतानाच आजुबाजुचे लोक जमा झाले. त्यांनी शाहेदला आवरले आणि मसुराबाईला तेथून जाण्यास सांगितले. यानंतर तिने थेट पोलीस स्टेशन गाठले.