कर्जमाफीवरुन सुकाणू समिती आक्रमक, 14ऑगस्टला राजव्यापी चक्का जाम आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2017 15:45 IST2017-08-12T15:42:52+5:302017-08-12T15:45:02+5:30
शेतक-यांच्या सुकाणू समितीने कर्जमाफीच्या मुद्यावरुन पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

कर्जमाफीवरुन सुकाणू समिती आक्रमक, 14ऑगस्टला राजव्यापी चक्का जाम आंदोलन
मुंबई, दि. 12 - शेतक-यांच्या सुकाणू समितीने कर्जमाफीच्या मुद्यावरुन पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. 14 ऑगस्टला राजव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येईल असे मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखण्याचा इशारा सुकाणू समितीने दिला आहे. कर्जमाफी करा मगच ध्वजारोहण करा असे शेतकरी नेते अजित नवले यांनी सांगितले.
शिपायाच्या हस्ते ध्वजारोहण करा असे रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले. रघुनाथदादा पाटील, अजित नवले आणि आमदार बच्चू कडू या पत्रकारपरिषदेला उपस्थि आहेत.