माजी राष्ट्रपती यांच्या नातेवाइकाच्या घरी चोरी

By Admin | Updated: July 15, 2017 01:10 IST2017-07-15T01:10:33+5:302017-07-15T01:10:33+5:30

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निगडी येथील नातेवाइकाच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला

Stealing the house of a former President's relative | माजी राष्ट्रपती यांच्या नातेवाइकाच्या घरी चोरी

माजी राष्ट्रपती यांच्या नातेवाइकाच्या घरी चोरी

लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या निगडी येथील नातेवाइकाच्या घरी चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांत शुक्रवारी घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी प्राधिकरणातील बिजलीनगर कॉर्नर गुरूनानक आॅटोमोबाइलजवळ पूजा अपार्टमेंट ही इमारत आहे. तिथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे नातेवाईक नरेंद्रसिंह एस पाटील (वय ३२, पूजा क्लासिक अपार्टमेंट, निगडी प्राधिकरण) राहतात. ते १५ दिवसांपासून कामानिमित्त दिल्लीला गेले आहेत. चोरट्यांनी घर फोडल्याचे प्रकरण गुरुवारी रात्री उघडकीस आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाटील यांच्या घरातून सुमारे अडीच लाख रुपये रोख चोरीला गेले असून, घरातील सोन्याचे दागिने किंवा अन्य मुद्देमाल चोरीला गेलेला नाही.
गेल्या पंधरा दिवसांपासून हे घर बंद आहे. चोरी झाल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तपास सुरू केला आहे. तसेच नातेवाइकांनाही कळविले आहे. घरमालक आल्यानंतर रोख रकमेशिवाय आणखी काही मुद्देमाल चोरीला गेला आहे की नाही, याची माहिती घेण्यात येईल, असे निगडीचे पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी सांगितले.

Web Title: Stealing the house of a former President's relative