शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

पिस्तूलनंतर रात्रीच्या अंधारात दांडे आणि कुऱ्हाडी; मनोरमा खेडकरांचा आणखी एक कथित व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2024 14:47 IST

Manorama Khedkar New Video: पूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर पिस्तुल प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. आज दुसरा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भपकेबाजीवरून वादात सापडलेल्या ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर व त्यांच्या कुटुंबाबाबत एकेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. पूजा यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांचा काही दिवसांपूर्वी पिस्तूल घेऊन मुळशीतील शेतकऱ्यांना धमकावतानाचा जुना व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता रात्रीच्या अंधारात दांडे, कुऱ्हाडी घेऊन पोलिसांसह नागरिकांना दमदाटी करतानाचा व्हिडीओ समोर येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा व्हिडीओ पोलिसांनीच पुरावा म्हणून रेकॉर्ड केलेला आहे. डॉ. च्या मिस पूजा, २०२० मध्ये ३० वर्षांच्या २०२३ मध्ये ३१; पूजा खेडकरांनी वयातही बनाव केलाहा प्रकार २०२२ मधील आहे. बाणेरमध्ये मेट्रोचे काम सुरु आहे. या भागात खेडकर यांचा ओमदीप बंगला आहे. त्या बंगल्यासमोरून मेट्रो जात आहे. या कामावरून मनोरमा आणि त्यांच्या कुटुंबाने मोठा वाद घातला होता. मेट्रो कामासाठी आणलेले साहित्य मेट्रो कर्मचाऱ्यांनी तेथील फुटपाथवर उतरविले होते. यावरून मनोरमा आणि कुटुंबियांनी वाद घातला होता. या वादानंतर पोलिसांना बोलविण्यात आले होते. या व्हिडीओमध्ये अंधारात पोलीस दिसत असून एक महिलाही जोरजोराने भांडताना दिसत आहे. याबाबतचे वृत्त न्यूज १८ लोकमतने दिलेले आहे.

तुम्ही कायदा हातात घेत दांडे आणि कुऱ्हाडी घेऊन येताय मग कोणाला सांगायचे. आम्ही कशासाठी आलोय. तुमचे काम नाही का आमच्याशी बोलायचे, असा सवाल पोलीस मनोरमा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना विचारताना दिसत आहेत. पोलीस त्यांना विचारत असताना एक तरुण येऊन त्यांचा व्हिडीओ रेकॉर्डिंग थांबविण्यासाठी कॅमेरासमोर हात धरताना दिसत आहे. 

पूजा खेडकर यांच्या मातोश्रींवर पिस्तुल प्रकरणी एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तसेच आज पुणे पोलीस त्यांच्या घरी पोहोचले आहेत. यापूर्वी पूजा खेडकर यांच्या ऑडी गाडीची नोटीस देण्यासाठी पोलीस गेले असता मनोरमा यांनी पोलिसांना आणि पत्रकारांना धमक्या दिल्या होत्या. तुम्हाला आत टाकेन, असे म्हणाल्या होत्या. तसेच गेटही उघडले नव्हते. यामुळे या वादग्रस्त मनोरमा खेडकर यांच्यावर पोलीस काय कारवाई करतात याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. बिल्डर बाळाच्या कुटुंबानंतर आता आयएएस खेडकर कुटुंबाची अरेरावीचे एकेक प्रकार समोर येत आहेत.  

टॅग्स :ias pooja khedkarपूजा खेडकरPoliceपोलिसPuneपुणेCrime Newsगुन्हेगारीupscकेंद्रीय लोकसेवा आयोग