शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

खोट्या तक्रारी मागे न घेतल्यास जैन समाजाचे राज्यभर आंदोलन, दीक्षार्थींच्या फलक वादप्रकरणी इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 01:54 IST

Jalgaon : अमळनेर येथील नवयुवक विनय बागरेचा (१६) हा जैन दीक्षा घेत आहे. याबाबत जैन समाजाने दीक्षार्थी युवकाच्या सन्मानार्थ काही फलक लावले होते.

अमळनेर (जि. जळगाव) :  जैन दीक्षार्थीच्या सन्मानार्थ लावलेले फलक हटविणारे अमळनेर पालिकेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी जैन समाजातील युवकांवर दाखल केलेल्या खोट्या तक्रारी मागे घ्याव्यात; अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे. या मुजोर अधिकाऱ्यास बडतर्फ करण्याची मागणी अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे.अमळनेर येथील नवयुवक विनय बागरेचा (१६) हा जैन दीक्षा घेत आहे. याबाबत जैन समाजाने दीक्षार्थी युवकाच्या सन्मानार्थ काही फलक लावले होते. गत मंगळवारी रात्री उपमुख्याधिकारी गायकवाड यांनी ते फलक काढून टाकले, तसेच यावेळी तिथे आलेल्या जैन समाजातील लोकांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. समाजाच्या भावना दुखावल्याने गायकवाड यांच्याविरोधात युवकांनी तक्रार दिली. त्यावरून गायकवाड यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.दरम्यान, आपले दुष्कृत्य बाहेर पडू नये, यासाठी गायकवाड यांनी युवकांना धमक्या दिल्या व खोट्या माहितीच्या आधारे विविध कलमांखाली तक्रार दिली. यानंतर गुन्हे दाखल झाले. या अधिकाऱ्यास तात्काळ बडतर्फ करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, युवकांविरुद्धच्या तक्रारी मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. संजय गोलेच्छा, भरत कोठारी, योगेश कोठारी, महावीर पहाडे, जितेंद्र जैन, योगेश मुंदडा, निशांत अगरवाल, प्रसन्न जैन, दीपक देसाई, पंकज मुंदडा या युवकांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुख्याधिकाऱ्यांनी मागविला लेखी खुलासाफलक वादप्रकरणी नेमकी काय परिस्थिती आहे, याबाबत २४ तासांच्या आत लेखी खुलासा सादर करावा, अशी नोटीस अमळनेर न.पा.च्या मुख्याधिकाऱ्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांना बजावली आहे.

समाजामधील समतोल बिघडविण्याचा कुणी प्रयत्न करीत असेल, तर अशांविरुद्ध सरकारने ताबडतोब कारवाई करावी.-विजय दर्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, अ.भा. जैन समाज

अमळनेर येथील या घटनेबाबत देशभरातील जैन समाजामध्ये संतापाची तीव्र लाट पसरली आहे. या दोषी अधिकाऱ्यास शिक्षा होईपर्यंत लढा देऊ.-ललित गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ 

टॅग्स :Jalgaonजळगावagitationआंदोलन