शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील साखर कारखान्यांकडे एफआरपीची पावणेपाच हजार कोटींची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 19:06 IST

राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे...

ठळक मुद्दे३४ कारखान्यांनी दिली शंभर टक्के देणी : १६१ कारखान्यांकडे थकीत रक्कम

पुणे : राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे मार्च अखेरीस ४ हजार ८३१ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी असून, अवघ्या ३४ कारखान्यांनी उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) शंभर टक्के देणी दिली आहेत. राज्यातील १०२ सहकारी आणि ९३ खासगी अशा १९५ साखर कारखान्यातून १ एप्रिल अखेरीस ९३९.१४ लाख टन ऊस गाळपातून १०५ लाख टन साखर उत्पादित झाली आहे. तर, १३८ साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. राज्यात १५ मार्च अखेरीस ९०५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यानुसार २१ हजार १५४ कोटी ४८ लाख रुपयांची एफआरपी होते. त्यापैकी १६ हजार ५४४ कोटी ९३ लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. अजूनही पावणेपाच हजार कोटींहून अधिक रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील १६१ साखर कारखान्यांकडे एफआरपीची रक्कम थकीत आहे. अवघ्या ३४ कारखान्यांनीच शेतकऱ्यांची एफआरपीची रक्कम दिलेली आहे. तर, पाच कारखान्यांनी एफआरपीची एकही दमडी शेतकऱ्यांना दिलेली नाही. तर, १२ कारखान्यांनी शंभरातील ३९ रुपयेच कारखान्यांना दिले आहेत. या पुर्वीच्या हंगामातील २५८.४८ कोटी रुपयांची थकबाकी काही कारखान्यांकडे आहे. वारंवार बजावूनही एफआरपी न देणाऱ्या ४९ कारखान्यांवर साखर आयुक्तालयाने रेव्हेन्यू रिकव्हरी सर्टिफिकेटची (आरआरसी) कारवाई केली आहे. ----

शंभरटक्के एफआरपी दिलेले   कारखाने- ३४८० ते ९९ टक्के दिलेले            - ५७६० ते ७९ टक्के                 -५३४० ते ५९ टक्के                - ३४३९ टक्क्यांंपेक्षा कमी                 -१२शून्य एफआरपी दिलेले             ५मागील थकीत एफआरपी       २५८.४८ कोटी

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेGovernmentसरकार