निवेदनांचा पाऊ स!
By Admin | Updated: August 18, 2014 00:38 IST2014-08-18T00:38:20+5:302014-08-18T00:38:20+5:30
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी रविवारी आयोजित जनता दरबारात तीन हजारांहून अधिक लोकांनी निवेदने दिली. वैयक्तिक तसेच शिष्टमंडळांनी प्रत्यक्ष भेट

निवेदनांचा पाऊ स!
गडकरींचा जनता दरबार : तीन हजारांवर लोकांची नोंदणी
नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या महाल येथील निवासस्थानी रविवारी आयोजित जनता दरबारात तीन हजारांहून अधिक लोकांनी निवेदने दिली. वैयक्तिक तसेच शिष्टमंडळांनी प्रत्यक्ष भेट घेऊन गडकरी यांच्यापुढे तक्रारी मांडल्या.
सकाळी ९ पासून जनता दरबाराला सुरुवात होऊनही वाड्यावर सायंकाळी लोकांची रांग होतीच. दिवसभरात २१५० वैयक्तिक स्वरूपाची निवेदने आली. आॅटो युनियन, विविध कामगार संघटनांचे शिष्टमंडळ अशा २५० लोकांनी गडकरींकडे तक्र ारी सोडविण्याची मागणी केली. त्यातच पक्षप्रवेश घेणारे व कामानिमित्त येणाऱ्यांची भर पडल्याने गडकरींचा वाडा गर्दींने गजबजून गेला होता.
निवेदन देण्यासाठी लोकांनी सकाळपासून रांग लावली होती. प्रचंड गर्दी झाल्याने वाड्यावर पाय ठेवायलाही जागा नव्हती. परंतु गर्दीची पर्वा न करता रांगेत उभे राहून लोकांनी गडकरी यांच्यापुढे समस्या मांडल्या. यात महिलांचाही सहभाग होता.
आॅटो चालकांच्या अनेक समस्या आहेत. १५ वर्षांपूर्वीचे आॅटो तसेच शाळेत विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या आॅटो चालकांच्या समस्या आहेत. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी २२ आॅगस्टला रविभवन येथे बैठक आयोजित केली आहे. आरटीओ अधिकारी उपस्थित राहणार असून समस्यांवर तोडगा काढला जाणार आहे. विविध कामगार संघटनांच्या शिष्टमंडळांनी गडकरींना निवेदने दिली. कामावरून काढणे, नियमित वेतन न मिळणे आदी समस्या संघटनांनी मांडल्या. समस्या तातडीने मार्गी लावण्याची ग्वाही गडकरींनी दिली. वैयक्तिक स्वरूपाच्या तक्रारक र्त्यांची सर्वाधिक संख्या होती. अनेक जण किरकोळ तक्र ारी घेऊन आले होते. (प्रतिनिधी)