शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

महाराष्ट्रातील ८३ किल्ले बनले राज्य संरक्षित स्मारक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 04:58 IST

गड-किल्ले संवर्धन समितीचा निर्णय; ठाण्यातील ११, रायगडमधील ९ किल्ल्यांचा समावेश

पोलादपूर : महाराष्ट्र शासनाच्या गड-किल्ले संवर्धन समितीने घेतलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे महाराष्ट्रातील ८३ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहेत. त्यात ठाणे जिल्ह्यातील ११, तर रायगड जिल्ह्यातील नऊ किल्ल्यांचा समावेश आहे. याबाबतची माहिती गडसंवर्धन समितीचे सदस्य अमर आडके यांनी दिली. ८३ किल्ल्यांपैकी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत.पोलादपूर तालुक्यातील ढवळे विभागातील किल्ले चंद्रगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. चंद्रगड, कंगोरीगड या गडांवर गेल्या चार-पाच वर्षांत पर्यटक मोठ्या संख्येने येत असून ढवळे, चंद्रगड ते और्थर सेट महाबळेश्वर असा ट्रेक अनेकजण करतात, त्यामुळे चंद्रगडला विशेष महत्त्व आहे. १६५६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड स्वराज्यात आणला. जोर खोरे, ढवळे घाट, जावळी खोरे या सर्व विभागांवर नजर ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात होता. हा गड राज्य संरक्षित स्मारक झाल्याने सोयी-सुविधा उपलब्ध होऊन पर्यटक मोठ्या संख्येने सहभागी होतील आणि स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होईल, अशी आशा आडके यांना आहे.गडसंवर्धन समितीच्या बैठकीमध्ये काही महत्त्वाचे किल्ले पहिल्या टप्प्यात संरक्षित करण्याचा निर्णय झाला. हे किल्ले ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे असूनही ते अनेक वर्षे संरक्षित केले गेले नव्हते. म्हणजे त्या किल्ल्यांना राज्य संरक्षित स्मारक हा दर्जा नव्हता. ज्या असंरक्षित किल्ल्यांवर अवशेष शिल्लक आहेत व ज्यांचा पुरातत्त्वीय संकेतानुसार विकास करण्यास वाव आहे, असे असंरक्षित किल्ले महाराष्ट्र शासनाने ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करावेत, अशी मागणी समिती सदस्यांनी ६ एप्रिल २०१६ रोजी केली होती, अशी माहिती आडके यांनी दिली. त्यानुसार बैठकीमध्ये पुढील किल्ले लवकरात लवकर संरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला.पहिल्या टप्प्यातील किल्लेठाणे जिल्हा - तारापूर, केळवे, माहिम, तांदूळवाडी, कोहोज, अशेरी, गोरखगड, गंभीरगड, सेगवा, भवानगड, मलंगगडरायगड जिल्हा - खांदेरी, थळ, सागरगड, साम्राजगड, कर्नाळा, मृगगड, सांकशी, सरसगड, पेब, चंद्रगडरत्नागिरी जिल्हा - कनकदुर्ग, साटवली, पालगड, महिपतगड, सुमारगड, नवते किंवा गुढे किल्लासिंधुदुर्ग जिल्हा - देवगडसातारा जिल्हा - चंदन, वंदन, वैराटगड, पांडवगड, अजिंक्यतारा, वारुगड, संतोषगड, भूषणगड, वर्धनगड, वसंतगड, दातेगड, कमळगड, वासोटा, नांदगिरी, केंजळगड, भैरवगडसांगली जिल्हा - प्रचितगड, भूपाळगड, मच्छींद्रगडकोल्हापूर जिल्हा - शिवगड, कलानिधीगड, गंधर्वगड, पारगड, गगनगड, पावनगड, सामानगड, महिपालगडपुणे जिल्हा - तिकोना, तुंग, घनगड, हडसर, चावंड, रोहिडाअहमदनगर जिल्हा - बहादूरगड, हरिश्चंद्रगड, पट्टा, अलंग, कुलंग आणि मदननाशिक जिल्हा - कावनई, त्रिंगलवाडी, त्रिंबकगड, हर्षगड, भास्करगड, चौल्हेर, धोडप, हातगड, अहिवंतगड, रवळ्या, जवळ्या, माकंर्डेया, इंद्राई, राजदेहेर, चांदवड, डेरमाळऔरंगाबाद जिल्हा - सुतोंडा५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारकविशेष म्हणजे, या ८३ किल्ल्यांपैकी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक घोषित होण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. पुरातत्त्व विभागाने सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. अशा प्रकारे एकाच वेळी ५१ किल्ले राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्र शासनाने गठीत केलेल्या गडसंवर्धन समितीचे आणि महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाचे हे यश आहे. या यादीत जे किल्ले नाहीत; पण ऐतिहासिक तसेच पुरातत्त्वीय दृष्टीने महत्त्वाचे आहेत अशा किल्ल्यांची नावे पुढील टप्प्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत.

टॅग्स :FortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज