शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
5
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
6
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
7
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
8
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
9
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
10
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
11
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
12
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
13
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
14
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
16
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
17
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
18
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
19
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
20
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा

...तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही होईल बिकट

By admin | Updated: June 7, 2015 01:55 IST

राज्यातील उपलब्ध पाण्याचे शेती आणि उद्योगांसाठीचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही बिकट होईल

मुंबई : राज्यातील उपलब्ध पाण्याचे शेती आणि उद्योगांसाठीचे नियोजन योग्य पद्धतीने केले नाही, तर महाराष्ट्राची अवस्था राजस्थानपेक्षाही बिकट होईल, असा इशारा मॅगसेसे विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनी शनिवारी येथे दिला. राज्यातील पाण्याचे दुर्भीक्ष लक्षात घेता पीक पद्धतीत आमुलाग्र बदल करण्याची गरज असून, त्यासाठी येथील नेतृत्वाने राजकीय इच्छाशक्ती दाखविली पाहिजे, असे ते म्हणाले.मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. गेल्या दोन वर्षांत राज्यात सूक्ष्म सिंचनावर २ हजार ७०० कोटी रुपये खर्च झाले. मात्र, त्या मानाने सिंचन झालेले दिसत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यातील धरणे ही गाळाने भरली असल्याने पावसाचे पाणी झिरपण्याची प्रक्रियाच थांबली आहे. नद्या, विहिरी, बोअरवेल्स कोरड्या पडत आहेत. परिणामत: पाणी संकटाचा सामना करावा लागत आहे, असे ते म्हणाले. राजेंद्रसिंह यांनी नद्याजोड प्रकल्पावर टीका केली. राज्य शासनाची जलयुक्त शिवार योजना चांगली आहे पण या योजनेत कंत्राटदार घुसू देऊ नका, असा इशारा देऊन राजेंद्रसिंह म्हणाले की, या योजनेचे चांगले परिणाम दिसण्यासाठी काही कालावधी जावा लागेल. (विशेष प्रतिनिधी)