शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

‘लोकमत’ सरपंच अ‍वॉर्डचा बुधवारी मुंबईत होणार राज्यस्तरीय सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2018 14:34 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला ‘लोकमत सरपंच आॅफ द ईअर’चा मुकुट कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार याची उत्सुकता २८ मार्च रोजी संपणार आहे. 

मुंबई : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला ‘लोकमत सरपंच आॅफ द ईअर’चा मुकुट कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार याची उत्सुकता २८ मार्च रोजी संपणार आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित भव्य सोहळ्यात गावाची शान असलेल्या राज्यातील १३ सरपंचांना ‘लोकमत’च्या पुरस्कारांनी गौरविले जाणार आहे.गावांच्या बदलांसाठी सरपंचांकडून सुरू असलेल्या धडपडीची नोंद घेण्यासाठी ‘लोकमत’ने सरपंच अ‍वॉर्ड सुरू केले आहेत. सरपंचांना वैयक्तिक पातळीवर गौरविणारा राज्यातील व पंचायत राज व्यवस्थेतीलही हा पहिलाच पुरस्कार आहे. ‘बीकेटी टायर्स’ हे या उपक्रमाचे मुख्य प्रायोजक असून ‘पतंजली आयुर्वेद’ हे प्रायोजक, तर ‘महिंद्रा ट्रॅक्टर्स’ हे सहप्रायोजक आहेत.पहिल्याच वर्षी या पुरस्कारांना राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. राज्यातील १८ जिल्ह्यांमधून पुरस्कारांसाठी प्रस्ताव दाखल झाले होते. त्यातून प्रत्येक जिल्हास्तरावर आदर्श सरपंचांना गौरविण्यात आले. आता जिल्हास्तरीय विजेत्यांतून राज्यस्तरावरील पुरस्कारार्थींची निवड होणार आहे. नामवंत ज्युरी मंडळ राज्यस्तरीय सरपंचांची निवड करणार आहे. बुधवारी नरिमन पॉइंटवरील यशवंतराव चव्हाण सभागृहात सकाळी ११ वाजता सोहळा पार पडणार असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अध्यक्षस्थानी असतील. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि रणजीत पाटील यांच्यासह विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्टÑवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ‘लोकमत’च्या एडिटोरीयल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.आदर्श गाव समितीचे राज्य कार्याध्यक्ष पोपटराव पवार, प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे प्रमुख मकरंद अनासपुरे, प्रदर्शनाच्या वाटेवर असलेला रणांगण सिनेमाचा नायक स्वप्निल जोशी व नायिका प्रणाली घोगरे तसेच अभिनेत्री स्पृहा जोशी कार्यक्रमाचे विशेष निमंत्रित असतील.> राज्यभरातील सरपंचांची उपस्थितीअकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, औरंगाबाद, लातूर, रायगड, अहमदनगर, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर या १८ जिल्ह्यांतील सरपंच या पुरस्कार योजनेत सहभागी झाले आहेत. या सरपंचांमध्ये राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी रस्सीखेच आहे. जिल्हास्तरावर विजेत्या ठरलेल्या सर्व सरपंचांना या सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.> १३ पुरस्कारांची होणार घोषणाजल, वीज व्यवस्थापन, शिक्षण, स्वच्छता, आरोग्य, पायाभूत सेवा, ग्रामरक्षण, पर्यावरण, प्रशासन-लोकसहभाग, रोजगार, कृषी या ११ विभागांत केलेल्या उल्लेखनीय कामांसाठी राज्यस्तरावर प्रत्येकी एक सरपंच निवडला जाणार आहे. ‘उदयोन्मुख नेतृत्व’ व सर्वांगीण काम करणाऱ्या सरपंचासाठी ‘सरपंच आॅफ द ईअर’ असे दोन स्वतंत्र पुरस्कारही दिले जाणार आहेत. पुरस्कारार्थींची घोषणा सोहळ्यात होणार आहे.>बुधवार : २८ मार्चयशवंतराव चव्हाण सभागृह, नरिमन पॉइंट, मुंबईसकाळी ११ वाजता

टॅग्स :sarpanchसरपंच