शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा राज्य सरकारचा विचार, पाहा काय म्हणाले केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 19:16 IST

राज्य सरकार इयत्ता पहिली ते चौथीच्या मुलांना दिला जाणारा गृहपाठ बंद करण्याचा विचार करत आहे. पाहा शिक्षण क्षेत्रात काय बदल होणार, काय म्हणाले केसरकर...

राज्यात शिक्षण क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन आहे. लवकरच यावर तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक निर्णय घेण्यात आले. जर यावर शिक्कामोर्तब झालं तर हा निर्णय ऐतिहासिक ठरू शकतो.

“मुलांना ओव्हरबर्डन करू नये, त्यांच्या मेंदूचा विकास होऊ दिला पाहिजे असं माझं मत आहे. तर गृहपाठ शिक्षकांसाठी पळवाटदेखील असता कामा नये. मला शिक्षकांबद्दल आदर आहे. आपण जे काही अर्धा तास शिकवतो ते त्यांनी लक्षपूर्वक शिकवलं पाहिजे की विद्यार्थ्यांना गृहपाठ करण्याची आवश्यकताच राहता कामा नये. हे माझं वैयक्तिक मत आहे,” असं केसरकर म्हणाले.“यासंदर्भात मी शिक्षकांच्या असोसिएशन आहेत त्यांच्याशी, संस्था चालकांशी बोलेन आणि त्यानंतर निर्णय घेईन. इतका मोठा निर्णय सहजासहजी घेता येत नाही,” असंही त्यांनी स्पष्ट केलं. दुसरी बाब म्हणजे आम्ही आता एज्युकेशनल सिस्टमला जी काही पुस्तकं देतोय ती पूर्णपणे बदलत आहोत. एक धडा झाल्यावर त्यालाच जोडलेले दोन पेपर्स असतील. म्हणजे मुलं धडा झाल्यानंतर त्यातच नोंद करू शकेल. पुस्तकं तीन भागांमध्ये असतील. पुढच्या वर्षी जेव्हा मुल शाळेत जाईल तेव्हा ते एकच पुस्तक घेऊन जाईल. हा प्रयोग १०० टक्के यशस्वी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtraमहाराष्ट्रEducationशिक्षण