‘हे’ राज्य सरकार घरच्यासारखे वाटते : विखे

By Admin | Updated: July 9, 2017 03:04 IST2017-07-09T03:04:41+5:302017-07-09T03:04:41+5:30

‘या’ सरकारमध्ये आधीच्या सरकारपेक्षा माझे अधिक मित्र आहेत. मला ‘या’ सरकारमध्ये घरी असल्यासारखे वाटते, असे उद्गार विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण

'This' state government feels like home: Dry | ‘हे’ राज्य सरकार घरच्यासारखे वाटते : विखे

‘हे’ राज्य सरकार घरच्यासारखे वाटते : विखे

लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी : ‘या’ सरकारमध्ये आधीच्या सरकारपेक्षा माझे अधिक मित्र आहेत. मला ‘या’ सरकारमध्ये घरी असल्यासारखे वाटते, असे उद्गार विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे काढले.
अमृत योजनेतून शिर्डी नगरपंचायतीच्या ३७ कोटी वाढीव पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. गिरीष महाजन, राम शिंदे आदी उपस्थित होते. विखे म्हणाले, पूर्वीच्या सरकारमधील लोकांनी मला त्रास व्हावा यासाठी कालव्यांची कामे प्रलंबित ठेवली. या सरकारने कालव्यांसाठी निधी द्यावा.

Web Title: 'This' state government feels like home: Dry