शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

19 ऑगस्टपासून डिजिटल महाराष्ट्र होणार ऑफलाइन; संगणक परिचालकांचे कामबंद आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 12:04 IST

राज्यातील सुमारे २८ हजार ग्रामपंचायतीच्या संगणकपरिचालकांचे १९ ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन करणार आहेत.  महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याची मागणी करण्यात आली आहे. 

मुंबई -  राज्यातील ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर आपले सरकार प्रकल्पात काम करणारे हजारो संगणक परिचालक 19 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्यासह इतर मागण्यांसाठी बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी दिली.

मागील 2011 पासून संग्राम व आपले सरकार प्रकल्पात मागील 8 वर्षापासून प्रामाणिकपणे काम करून डिजिटल महाराष्ट्र साकार करणार्‍या संगणक परिचालकांना शासनाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी अनेक आश्वासने दिली. परंतु त्या आश्वासनाची पूर्तता केली नाही. संगणक परिचालकांच्या माध्यमातून राज्यशासनाला केंद्र शासनाकडून सलग 3 वेळा प्रथम क्रमांकाचा तर एकवेळा द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार याच संगणक परिचालकामुळे मिळाला आहे. याच संगणकपरिचालकानी रात्रदिवस कामकरून शेतकरी कर्जमाफी योजना यशस्वी केली, 28 हजार ग्रामपंचायती मधील सुमारे 6 कोटी नागरिकांना 1 ते 29 प्रकारचे ऑनलाईन दाखले देणे, ग्रामीण भागातील लाखो नागरिकांचा प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीणचा सर्व्हे,अस्मिता योजनेसह जनगणना,प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना,सध्या सुरू असलेले प्रधानमंत्री आयुष्यमान योजना यासह अनेक योजनेचे काम संगणक परिचालक करत असतात. 

संगणक परिचालकाना शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे 6 महीने ते 1 वर्ष मानधन मिळत नाही. मुंबई येथे झालेल्या आंदोलनादरम्यान 30 नोव्हेंबर 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १० दिवसात बैठक घेऊन महाराष्ट्र आय.टी.महामंडळात घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते परंतु ८ महिने झाले तरी शासनाने निर्णय न दिल्यामुळे राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायती, 351 पंचायत समित्या व 34 जिल्हा परिषदामध्ये कार्यरत असलेले सुमारे 22,500 संगणक परिचालक बेमुदत कामबंद आंदोलन करणार आहेत. जो पर्यंत शासन मागण्या मान्य करणार नाही तो पर्यंत बेमुदत कामबंद आंदोलन सुरुच राहणार असल्याचे महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष सिद्धेश्वर मुंडे यांनी सांगितले.

प्रमुख मागण्या-१) राज्यातील सर्व ग्रामपंचायत संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून संगणक परिचालक म्हणून कायमस्वरूपी नियुक्ती देणे. २)पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने मंजूरी दिली असून त्याचा शासन निर्णय काडून त्यांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून नियुक्ती द्यावी. ३)सर्व संगणक परिचालकांचे मानधन 14 व्या वित्त आयोगातून न देता राज्य शासनाच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५००० रुपये द्यावे. ४)सर्व संगणक परिचालकांचे मागील एप्रिल 2017 ते जुलै 2019 पर्यंतचे सर्व थकीत मानधन देणे. ५)ज्या ग्रामपंचायतीनी आपले सरकार प्रकल्पासाठी निधी दिला नाही तेथील संगणक परिचालकांचे एप्रिल 2017 ते जुलै 2019 पर्यंतचे सर्व मानधन शासनाने आश्वासन दिल्या प्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून करणे. ६) छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान (शेतकरी कर्जमाफी) योजनेचे मानधन देणे.७)प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण चे ऑनलाईन सर्व्हे केलेले मानधन मिळणे.८)नोटिस न देता कमावरून कमी केलेल्या संगणक परिचालकांना परत कामावर घेणे.

टॅग्स :agitationआंदोलनDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPankaja Mundeपंकजा मुंडे