शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून गृहनिर्माण व बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 16:38 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दिलेली मुदतवाढ १५ सप्टेंबरला पूर्ण होत आहे

ठळक मुद्देगृहनिर्माण संस्था आणि बाजार समित्यांचाही समावेश

पुणे: राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणाकडून गृहनिर्माण सोसायट्या व कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना पुन्हा एकदा मुदतवाढ मिळण्याची चिन्हे आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी दिलेली मुदतवाढ १५ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. त्याआधीच हे आदेश निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात दीड लाखापेक्षा जास्त सहकारी संस्था आहे. त्यांच्या निवडणूका घेण्याची जबाबदारी या प्राधिकरणावर आहे. निवडणूक जाहीर करण्यापासून ते पार पडेपर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाच्या नियंत्रणाखाली असते. सन २०१९ मध्ये मुदत संपलेल्या १३ हजार ४३ संस्था होत्या. त्यांची निवडणूक प्रक्रिया प्राधिकरणाने सुरू केलीच होती. मात्र मार्चपासून कोरोना प्रादुर्भावास सुरूवात झाली व त्यांना मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर जानेवारी.२०२० पासून मागील ६ महिन्यात ३१ हजार ३९४ संस्थांची मुदत संपली आहे. त्यांनाही कोरोनामुळेच मुदतवाढ मिळाली. ही मूदत १५ सप्टेंबर ला पूर्ण होत आहे. कोरोना प्रादुर्भाव दरम्यानच्या काळात कमी होण्याऐवजी वाढलाच आहे. त्यामुळे आता प्राधिकरणाकडून पुन्हा मुदतवाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. किमान २ महिने मुदतवाढ दिली जाईल असे दिसते आहे.सहकार प्राधिकरणाचे सचिव यशनंत गिरी यांनी याला दुजोरा दिला. राज्यातील क्रुषी ऊत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकाही याच कारणामुळे पुढे ढकलण्यात येणार आहेत. सन २०१९ मध्ये ५२ व या वर्षातील अशा एकूण १८० समित्यांची मुदत संपली असून त्यांची निवडणूक प्रलंबित आहे. 

---//

सभासद संख्या २५० पेक्षा कमी असेल तर अशा संस्था स्वतःच त्यांची निवडणूक घेऊ शकतात. मात्र या संस्थांसाठी एक स्वतंत्र नियमावली तयार करण्यात येत आहे. त्याला आता वर्ष होऊन गेले, मात्र नियमावली झाली नाही. त्यामुळे या संस्थांच्याही निवडणुका प्रलंबित आहेत.  

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसElectionनिवडणूकState Governmentराज्य सरकार