शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
3
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
4
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
5
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
6
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
7
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
8
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
9
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
10
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
11
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
12
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
13
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
14
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
15
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
16
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
17
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
18
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
19
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

ग्रामीण भागात देणार दरडोई ५५ लिटर पाणी, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 05:37 IST

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणी द्वारे दरडोई ५५ लिटर प्रति दिवस गुणवत्तापूर्ण ...

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सन २०२४ पर्यंत वैयक्तिक नळजोडणी द्वारे दरडोई ५५ लिटर प्रति दिवस गुणवत्तापूर्ण पाणी देण्यात येणार आहेत. त्यासाठी जल जीवन मिशन योजना राबविण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेवर केंद्र व राज्य सरकार समसमान खर्च करणार आहेया मिशनसाठी मिशन संचालक या पदासाठी आयएएस संवर्गातील सचिव दर्जाचे पद नव्याने निर्माण करण्यात येत आहे. सध्या राज्यातील एकूण १ कोटी ३२ लाख कुटुंबांपैकी ५०.७५ लाख कुटुंबांकडे वैयक्तिक नळजोडणी उपलब्ध आहे. जल जीवन मिशन अंतर्गत उद्दीष्ट्य आहे.पेयजल योजनेस मुदतवाढमुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेचा कालावधी ३१ मार्च, २०२० रोजी संपुष्टात आला आहे. पण मंजूरी दिलेल्या प्रगतीपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याकरिता आता या योजनेस दोन वर्षे मुदतवाढ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.केशरी शिधापत्रिकाधारकांनासवलतीत अन्नधान्यकोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभुमीवर राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट होऊ न शकलेल्या एपीएल (केशरी) शिधापत्रिकाधारकांना जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांकरीता सवलतीच्या दराने अन्नधान्याचा लाभ देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. कोरोना प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर एपीएल (केशरी) मधील राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेत व शेतकरी योजनेत समाविष्ट नसलेल्या शिधापत्रिकाधारकांना प्रतिव्यक्ती ३ किलो गहू ८ रुपये प्रति किलो व २ किलो तांदूळ १२ रुपये प्रति किलो याप्रमाणे ५ किलो अन्नधान्य मे व जूनमध्ये दिले आहे. त्याच धर्तीवर जुलै व आॅगस्ट या दोन महिन्यांच्या कालावधीकरिता त्याच परिमाणात व दराने अन्नधान्य देण्यात येत आहे.कौशल्य विकासविभागाचे नाव बदललेकौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे नाव आता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग असे करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.रोजगार व स्वयंरोजगार या विभागाचे नाव यापूर्वीच कौशल्य विकास व उद्योजकता असे करण्यात आले आहे. मात्र, या नावात रोजगार हा शब्द नसल्याने रोजगार व स्वयंरोजगार बाबींसंदर्भात जनतेत संभ्रम निर्माण होतो. यामुळे हा निर्णय घेण्यात आला.विविध बँकांना शासकीयबँकींग व्यवहारास मान्यताप्रादेशिक ग्रामीण बँक, आयडीबीआय बँक तसेच राज्यातील अ वगार्तील १५ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना शासकीय बँकींग व्यवहार करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. शासकीय बँकींग व्यवहार करण्यास मान्यताप्राप्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, लातूर, अकोला, सिंधुदूर्ग, अहमदनगर, पुणे, सातारा, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचा समावेश आहे.डीपीच्या पूर्वतयारीतून महामारीचा काळ वगळणारमुंबई - कोणत्याही शहराच्या विकास आराखड्याच्या पूर्वतयारीसाठीच्या कालमर्यादेतून महामारीचा कालावधी वगळण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियमात सुधारणा करण्यास आणि त्यासाठी अध्यादेश काढण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली.आतापर्यंत निवडणूक आचारसंहितेचा कालावधी गृहित धरला जात नव्हता. आता त्यात कोरोना महामारीचा काळही गृहित धरला जाईल. एखाद्या शहराच्या विकास आराखड्याची पूर्वतयारी करण्यासाठी विशिष्ट मुदत देण्यात आली असेल तर त्या मुदतीत निवडणूक आचारसंहिता व महामारी या दोन्हींचा काळ वगळला जाईल.मुंबई आणि शिर्डी साठीच्या वगळलेल्या आराखड्यासाठीची (ईपी) पूर्वतयारीची मुदत तसेच औरंगाबाद सिडको विकास आराखडा,बीड शहर व माहूर विकास आराखड्याची पूर्वतयारीची मुदत २१ जुलै रोजी संपणार होती मात्र कोरोनाचा संकटकाळ (लॉकडाऊनचा कालावधी) जितके दिवस चालेल तितके दिवस या पूर्वतयारीस मुदतवाढ मिळाली आहे.शिवभोजन थाळी पाच रुपयातच मिळणारशिवभोजन थाळीचा दर पुढील ३ महिन्यांसाठी पाच रुपये एवढा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगांवचे विद्यार्थी इ. लोकांच्या जेवणांअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळीची किंमत ३० मार्चपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी पाच रुपये करण्यात आली होती. ही मुदत त्यापुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविली असून ६ कोटी रुपये एवढ्या वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली.

टॅग्स :WaterपाणीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार