शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक ठिकाणी मोकाट कुत्र्यांना खाऊ घातल्यास कारवाई; सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
2
आजचे राशीभविष्य : शनिवार, २३ ऑगस्ट २०२५; आज विविध क्षेत्रातून फायदा होईल, शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी आणि स्वस्थ राहाल
3
लोकमत इम्पॅक्ट: दूषित पाणीपुरवठ्याची मंत्री आशिष शेलारांकडून दखल; तत्काळ कार्यवाहीच्या सूचना
4
विशेष लेख: ५० रुपयांत कोट्यवधी जिंका? - आता विसरा ! ऑनलाइन मनी गेम्सच्या 'जुगारा'वर बंदी
5
भर पावसात गर्भवतीला घेऊन निघाली रुग्णवाहिका; वाटेतच कळा अन् डॉक्टरांनी घेतला स्तुत्य निर्णय
6
लेख: आपला गाढवपणा सोडून गाढवे का जपली पाहिजेत? आता गर्दभ संगोपनाचे प्रयत्न झालेत सुरू
7
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
8
आजचा अग्रलेख: तेलुगू की तामिळ? भारतीय राजकारणाचा उत्तरेकडून दक्षिणेकडे सरकणारा लंबक
9
प्रवाशांच्या हालअपेष्टा पाहून आम्हाला वेदना होतात...; कामातील दिरंगाईने हायकाेर्ट नाराज
10
मराठा समाजप्रश्नी मंत्रिमंडळ उपसमितीची पुनर्रचना; अध्यक्षपदी राधाकृष्ण विखे-पाटील
11
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
12
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अखेर ‘एसआयटी’ची स्थापना; अनेक दिवसांच्या मागणीला यश
13
मुंबईकरांचा प्रवास खड्ड्यात अन् सरकार ‘खो-खो’त मग्न; विचार न करता टोलमाफीचा निर्णय
14
अन्यायकारक वाटल्यास वेगळे लढण्याची मुभा हवी; कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊनच निर्णय
15
६१ कोटींच्या सायबर गुन्ह्यांचा पर्दाफाश; १२ जण जेरबंद; मुंबई पोलिस गुन्हे शाखेची कारवाई
16
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
17
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
18
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
19
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
20
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या

दहावीसाठी अंतर्गत मूल्यमापनाचा पर्याय, राज्य मंडळाच्या शाळांना मत नोदविण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2021 03:40 IST

राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन २० दिवसांचा कालावधी उलटला आहे, तरी अद्याप पुढची कार्यवाही काय असणार, याचा निर्णय शिक्षण विभाग किंवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेला नाही.

मुंबई : शाळास्तरावर विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन शक्य आहे का, त्यासाठी शाळा सक्षम आहेत का? त्यांची काय तयारी आहे, याची चाचपणी शिक्षण विभाग करणार आहे. राज्यातील इयत्ता दहावीचे विद्यार्थी असलेल्या सर्व शासकीय, शासकीय अनुदानित, विनाअनुदानित, खासगी शाळांच्या व्यवस्थापनाच्या शाळांची यासंदर्भातील मते आणि प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी शिक्षण विभागाने सर्वेक्षण हाती घेतले आहे. शाळांनी अचूक व स्पष्ट मत नोंदवावे, असे आवाहनही केले आहे. (State board asks suggestion to schools about Internal assessment option for 10th class)

राज्य शिक्षण विभागाने दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेऊन २० दिवसांचा कालावधी उलटला आहे, तरी अद्याप पुढची कार्यवाही काय असणार, याचा निर्णय शिक्षण विभाग किंवा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेला नाही. सीबीएसई मंडळाप्रमाणे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारावर गुण देण्यात येतील, असे घोषित करण्यात आले; मात्र त्यासंदर्भात तज्ज्ञांच्या बैठकांवर बैठका होऊनही कशाच्या आधारावर मूल्यमापन करावे याचे उत्तर शिक्षण विभागाला मिळाले नसल्याने त्याबाबतीतही काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही. दहावीच्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा जीव मात्र यामुळे टांगणीला लागला असून शिक्षण विभाग वेळकाढूपणा का करीत आहे, असा सवाल ते विचारू लागल्याने आता शिक्षण विभागाने शाळास्तरावरच अंतर्गत मूल्यमापन करता येईल का, असा पर्याय समोर मांडून शाळांकडून याची चाचपणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकीकडे शिक्षण विभागाकडून शाळास्तरावर अंतर्गत मूल्यमापनाची चाचपणी होत असताना दुसरीकडे शाळास्तरावरील मूल्यमापन किती पारदर्शक असेल? राज्यातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांशी होणारे गुणांचे समानीकरण यातून कसे साधले जाईल, असा प्रश्न शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून उपस्थित होत आहे.

असे आहेत पर्याय-ज्या शाळांनी - शिक्षकांनी ऑनलाइन वर्ग घेतले, ऑनलाइन चाचण्या घेतल्या आहेत किंवा व्हाॅट्सॲपच्या माध्यमातून वर्ग / चाचण्या घेतल्या आहेत अशा शाळांना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन शाळास्तरावर करता येईल. -ज्या शाळांनी प्रथम, द्वितीय सत्रात परीक्षा घेतल्या आहेत त्यांचाही समावेश अंतर्गत मूल्यमापनामध्ये करता येणार आहे. -ज्या शाळांनी यापैकी काहीच केले नाही त्यांना विद्यार्थ्यांच्या नववीच्या गुणांच्या आधारावर अंतर्गत मूल्यमापन करता येईल, असा पर्याय शाळांना दिला आहे. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थीTeacherशिक्षक