In the state, 12,326 patients are free from covid in a day | राज्यात दिवसभरात १२,३२६ रुग्ण कोविडमुक्त

राज्यात दिवसभरात १२,३२६ रुग्ण कोविडमुक्त

मुंबई : राज्यात मंगळवारी दिवसभरात १२ हजार ३२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत २ लाख ९९ हजार ३५६ रुग्ण कोविडमुक्त झाले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६५.३७ टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यात दिवसभरात ७ हजार ७६० रुग्ण तर ३०० मृत्यू झाले. परिणामी, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ४ लाख ५७ हजार ९५६ झाली असून मृतांचा आकडा १६ हजार १४२ झाला.

सध्या १ लाख ४२ हजार २५१ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्याचा मृत्युदर ३.५२ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ३०० बळींमध्ये मुंबई ५६, ठाणे ६, ठाणे मनपा ७, नवी मुंबई मनपा ७, कल्याण-डोंबिवली मनपा ६, उल्हासनगर मनपा १, भिवंडी-निजामपूर मनपा १६, मीरा-भार्इंदर मनपा ८, पालघर १, वसई-विरार मनपा ४, रायगड ६, नाशिक ४, नाशिक मनपा ५, अहमदनगर २, धुळे २, धुळे मनपा १, जळगाव ७, जळगाव मनपा ५, नागपूर ३, नागपूर मनपा १४, वर्धा १ आदी रुग्णांचा समावेश आहे.

वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या मंगळवार सकाळच्या अहवालानुसार, नवजात बालक ते १० वर्षांपर्यंतच्या १७, ५६१ बालकांना कोरोनाची लागण झाली. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ३.९९ टक्के आहे, तर सर्वाधिक प्रमाण ३१ ते ४० वयोगटातील रुग्णांचे असून त्यांची संख्या ९१,३६९ आहे. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण २०.७४ टक्के आहे. ९१ ते १०० वयोगटातील ६१९ ज्येष्ठ नागरिकांना कोरोना झाला आहे. एकूण रुग्णसंख्येत हे प्रमाण ०.१६ टक्के आहे.

मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीत घट
मुंबईत दैनंदिन रुग्णवाढीत घट झाली आहे. मुंबईत बरे झालेल्या रुग्णांचा दर ७७ टक्के असून रुग्ण दुपटीचा दर ८० दिवसांवर गेला आहे. २८ जुलै ३ आॅगस्टपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर ०.८७ टक्क्यांवर आला. मंगळवारी ७०९ रुग्ण आढळले व ५६ मृत्यू झाले. कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १८ हजार ११५ झाली असून बळींचा आकडा ६,५४९ आहे. आतापर्यंत ९०,९६० रुग्ण बरे झाले, तर २०,३०९ सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In the state, 12,326 patients are free from covid in a day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.