रायगड महोत्सवाला आजपासून सुरुवात
By Admin | Updated: January 21, 2016 13:45 IST2016-01-21T12:55:57+5:302016-01-21T13:45:29+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर आजपासून रायगड महोत्सव सुरु होत आहे.

रायगड महोत्सवाला आजपासून सुरुवात
ऑनलाइन लोकमत
रायगड, दि. २१ - छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर आजपासून रायगड महोत्सव सुरु होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने रायगड आणि पायथ्याच्या पाचाडमध्ये शिवकालीन प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत.
राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. गडकिल्ल्यांच संवर्धन आणि पर्यटन विकास हा या महोत्सवा मागचा उद्देश आहे. २१ ते २४ जानेवारी दरम्यान हा महोत्सव होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या महोत्वाचे उदघाटन होणार आहे.