लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यासाठी मान्यवरांच्या आगमनास सुरुवात
By Admin | Updated: August 3, 2016 18:38 IST2016-08-03T18:03:51+5:302016-08-03T18:38:46+5:30
‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे

लोकमत विधीमंडळ पुरस्कार सोहळ्यासाठी मान्यवरांच्या आगमनास सुरुवात
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 03 - ‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे विधानसभा आणि विधान परिषदेत सर्वात्कृष्ट कार्य करणाऱ्या आमदारांना ‘लोकमत विधिमंडळ पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या ७०व्या वर्धापन दिनानिमित्त हा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यशवंत चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहात हा कार्यक्रम पार पडत आहे. मान्यवर अतिथी कार्यक्रमास्थळी पोहोचण्यास सुरुवात झाली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील, विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर, नारायण राणे, दिलीप वळसे पाटील, गणपतराव पाटील, वर्षा गायकवाड, आमदार तारासिंग, दामोदर तांडेल, पंकजा मुंडे, निलम गो-हे, प्रधान सचिव आनंद कळसे, आमदार इम्तियाज अली, वारिस पठाण, प्रकाश अबिटकर, डीसीपी मनोज कुमार शर्मा, अमीन पटेल, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राजकुमार बडोले, पंकजा मुंडे, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, वर्षा गायकवाड, अजित सावंत, शिवाजीराव देशमुख, धनंजय मुंडे, हरिभाऊ बागडे, विद्याताई चव्हाण कार्यक्रमस्थळी पोहोचले आहेत.